शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

....जेव्हा सिक्कीमचे माजी राज्यपाल खास शैलीत उलगडतात लावणीचे सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:32 IST

जेवणात मिठाचे जे महत्व आहे तेच आपल्या जगण्यात लावणीचे आहे. त्या लावणीच्या झटक्यात जगण्याची प्रेरणा मिळते....अशा शब्दात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी लावणीचे सौंदर्य आपल्या खास शैलीत उलगडले.

ठळक मुद्देलावणी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर गण गौळणीने लावणीच्या सादरीकरणाला सुरूवात सलग 12 तास चालणारा हा लावणी महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय

पुणे : लावणी म्हणजे सौंदर्य, नजाकत, ठेका धरायला लावणारी कला. लावणी म्हणजे लवण. लवण म्हणजे मीठ. आपल्या जेवणात मिठाचे जे महत्व आहे तेच आपल्या जगण्यात लावणीचे आहे. त्या लावणीच्या झटक्यात जगण्याची प्रेरणा मिळते....अशा शब्दात लावणीचे सौंदर्य आपल्या खास शैलीत उलगडत सिक्कीमचे माजी  राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी या कलावंत मुलींचा योग्य तो सन्मान राखायला हवा, याकडे रसिकांचे लक्ष वेधले. ही लोककला जिवंत ठेवणारे कलावंत आयुष्यभर रसिकांचे मनोरंजन करत असतात. त्या कलावंतांच्या वृद्धापकाळी त्यांचे आयुष्य समाधानात व्यतित व्हावे यासाठी सरकारने त्यांच्या वृद्धापकाळची सोय करायला हवी,याबाबत सरकारचा काही योजनांचा विचार चालू आहे. आता त्या योजना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले. पुणे नवरात्र महोत्सवातील लावणी महोत्सवाचे उदघाटन श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार, नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल मंचावर उपस्थित होते. सलग 12 तास चालणारा हा लावणी महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी या लावणी महोत्सवाला भेट दिली. आठवले यांनी आपल्या शीघ्र कवितेने उपस्थितांची मने जिंकली . निवडणुकीच्या राजकारणात आपण वेगळे असतो पण,भारतीय म्हणून आपण एक आहोत त्यामुळे माझे या व्यासपीठावर येण्याचा वेगळा अर्थ काढू नये अशी मिश्किल टिप्पणी आठवले यांनी करताच सभागृहात हशा पिकला.लावणी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर गण गौळणीने लावणीच्या सादरीकरणाला सुरूवात झाली. नंतर या रावजी बसा भाऊजी, बाई मी लाडाची कैरी पाडाची, मला आमदार झाल्यासारख वाटत गं, तुमच्या पुढ्यात कुटतेय मी ज्वानीचा मसाला, पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या सादर करण्यात आल्या. बुगडी माझी सांडली गं, तुझ्या उसाला लागलं कोल्हा, आई मला नेसव शालू नवा या जून्या लावण्यांनी वेळी सा-या गणेश कला रंगमंच येथे टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट झाला. लावणी महोत्सवातील महासंग्राम या कार्यक्रमात 'पाहुणं फक्त तुमच्यासाठी', 'लावणी धमाका', 'तुमच्यासाठी कायपण', 'छत्तीस नखरेवाली', 'ढोलकीच्या तालावर' या शीर्षकाखाली वेगवेगळ्या लावणी संस्थांनी ठसकेबाज लावण्या सादर केल्या या महोत्सवला प्रचंड गर्दी होती. महिलांचा सहभाग त्यात लक्षणीय होता.

.................

तुमच्या भागातील लोकांना वैचारिक दिशात्यामुळे तुम्ही आहात आमची आशा. आमच्या पँथरची असायची गावागावात छावणी त्यावेळी नेहमीच पाहायचो लावणी श्वेता शिंदे आहे आमची पाहुणी मग का नाही बघायची लावणी कलाकारांना उद्देशून ते म्हणाले तुमचा डान्स आत्ता सुरु आहे आमचा 2019 मध्ये सुरू होईल. अशा शाब्दिक फुलबाजीतून रामदास आठवले यांनी कवितेचा बार उडवला.

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्रीShrinivas Patilश्रीनिवास पाटीलRamdas Athawaleरामदास आठवले