शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नसरापूर येथे जेव्हा शेतकऱ्याचे शेतच जाते चोरीला......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 21:47 IST

औषधोपचारासाठी मुलाकडे आलेल्या शेतकऱ्याच्या शेतात विनापरवानगी उत्खनन करून माती उपसा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

ठळक मुद्देमाती लघु बंधारा विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारपरवानगीविना बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी कोळपे यांच्या शेतातील माती उपसली

नसरापूर : आजपर्यंत तुम्ही वस्तू , गाडी , दागिने, पैसे असे सगळे प्रकाराची चोरी झाल्याची घटना आपल्या ऐकिवात असू शकते. परंतु एखाद्याचे कसणारे शेत चोरीला जाण्याची घटना तशी दुर्मिळच. आणि ती चोरी सुध्दा दुसरे तिसरे कोणी नाही खुद्द लघु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्याकडून केली जाते हे अधिक आश्चर्यकारक म्हणावे लागेल. पण खरोखर अशी घटना घडली आहे. औषधोपचारासाठी पुण्याला मुलाकडे आलेल्या एक शेतकरी जेव्हा गावाला परततो. तेव्हा त्याला कसणाऱ्या जमिनीत फक्त खडकाळ मुरुम आढळतो. कितीतरी वर्ष ज्या शेतातून भरघोस पिके काढण्यात आली. आपल्या शेताची झालेली अशी अवस्था पाहून शेतकऱ्याच्या मनात जणूकाही आपले शेतच चोरीला गेले असल्याची भावना डोकावून गेली. हा प्रकार घडला भोर तालुक्यातील जांभळी येथील शेतकरी सर्जेराव विठ्ठ्ल कोळपे (वय ६७)यांच्यासोबत घडला. त्यांनी माती लघु बंधारा विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली आहे.     नसरापूरपासून जांभळी येथील कोळपे यांचे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यातील गट क्रमांक २२३ मधील १९ गुंठे क्षेत्र हे शेतीसाठी उपयोगात आहे. आजारपणामुळे ते गेले काहीदिवस आपल्या मुलाकडे पुणे येथे औषधोपचारासाठी गेले होते.गावच्या यात्रेकरीता कोळपे गावाला आले. त्यावेळी ते आपल्या शेतात गेले असताना आपली शेतजमीन नाहीशी झाली की काय असे दिसुन आले. यावेळी त्यांच्या शेतात ४ फुट खोल विनापरवाना (उत्खनन) खोदाई करून सर्व माती चोरुन नेण्यात आल्याचे चित्र दिसले. त्यामुळे शेतात माती न राहता केवळ मुरूम उरला आहे. कोळपे यांच्या शेतजमिनीतील जागेतून महसुल विभागाच्या पंचनाम्यानुसार अंदाजे ४ फुट खोल,३२ फुट रुंद व ४५० फुट लांब दक्षिणोत्तर उत्खनन करून सुमारे ५७६ ब्रास मातीची शेतकऱ्याच्या कोणत्याही परवानगीशिवाय वाहतूक करण्यात आली असल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे.     शेतातील माती पंचायत समिती भोर अंतर्गत लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोळपे यांच्या परवानगीविना बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी कोळपे यांच्या शेतातील माती नेली असल्याचे समजले.शेतातील माती खरडून नेल्यामुळे सुपीक जमीन मुरबाड झाली असल्याचे सांगत महसुल विभागाकडून त्या जमिनीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. सदर घटनेबद्दल तक्रार दिल्यावर चोरी गेलेल्या संबंधितावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही.

 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीCrimeगुन्हाPoliceपोलिस