शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट येथील जेधे चौकात निखळले पीएमपी बसचे चाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 21:01 IST

पुन्हा एकदा पीएमपीच्या जुन्या बसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण

ठळक मुद्देपीएमपीच्या ताफ्यामधील शेकडो बस १२ वर्षांपुढील

पुणे : सातत्याने वर्दळ असलेल्या स्वारगेट येथील जेधे चौकात शनिवारी सकाळी पीएमपी बसचे चाक निखळले. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने चाक बसजवळच पडले. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. ही बस १२ वर्षांपुर्वीची असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. परिणामी, पुन्हा एकदा पीएमपीच्या जुन्या बसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यामधील शेकडो बस १२ वर्षांपुढील आहेत. मागील काही महिन्यांत नवीन बस आल्याने पीएमपीकडून जुन्या बस भंगारात काढल्या जात आहेत. मात्र, अजूनही अपेक्षित बस उपलब्ध होत नसल्याने जुन्या बस मार्गावर धावतच आहेत. त्यामुळे या बसचे ब्रेकडाऊन, आग लागणे, चाक निखळण्याचे प्रकार घडतात. काही महिन्यांपुर्वीच नेहरू रस्त्यावर बसचे पुढचे डाव्या बाजूचे चाक निखळले होते. त्यानंतर आता सर्वाधिक वर्दळीच जेधे चौकातच चाक निखळल्याची घटना घडली. मार्केटयार्ड आगाराची बस जेधे चौकात आल्यानंतर पुढील उजव्या बाजूचे चाक बसपासून वेगळे झाले. दोन बेअरींगला जोडणारा ‘कास्टींग पीस’ तुटल्याने हा प्रकार घडला. यावेळी बसचा वेग मर्यादीत होता. त्यामुळे चाक तुटून जवळच पडले. यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते. पीएमपी प्रशासनाकडून अर्धा-पाऊण तासात ही बस दुरूस्त करून आगारात नेण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.‘पीएमपी’च्या ताफ्यामध्ये असलेल्या जुन्या बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक आहेत. काही बस १२ वर्षांपुढील असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. शनिवारी चाक निखळलेली बसही १२ वर्षांपुढील आहे. ताफ्यात नवीन बस दाखल होत असल्या तरी अद्याप पुरेसे प्रमाण नसल्याने जुन्या बस मार्गावर आणल्या जात आहेत. या बसची देखभाल-दुरूस्ती करण्यातही अडचणी निर्माण होतात. त्यांचे सुट्टे भाग मिळत नाहीत. त्यामुळे तात्पुरती दुरूस्ती करून बस मार्गावर सोडाव्या लागत आहेत.---------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेAccidentअपघात