शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरहेड केबलचे करायचे काय? महापालिकेच्या विद्युत विभागापुढे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:40 IST

महापालिकेने हाती घेतलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेंतर्गत विद्युत विभागाकडून केबल काढण्याचे काम केले जात आहे

बाणेर : बाणेर, बालेवाडी परिसरातील रस्त्यांचे पथदिव्यांचे खांब, झाडे आणि इमारतींवर अवैधरीत्या टाकण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या ओव्हरहेड केबल महापालिकेच्या विद्युत विभागाकडून कापून जप्त केल्या जातात. मात्र, या केबलचा संबंधित कंपन्या सोडवून नेत नाहीत, त्यांचा उपयोग इतर कोणत्याही कामासाठी होत नाही, त्यामुळे या केबलचे करायचे काय, असा प्रश्न विद्युत विभागापुढे निर्माण झाला आहे.            महापालिकेने हाती घेतलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेंतर्गत विद्युत विभागाकडून केबल काढण्याचे काम केले जात आहे. मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर केबल कापून विद्युत विभागाने जप्त केल्या आहेत. या केबल महापालिकेच्या औंध येथील अतिक्रमण विभागाच्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. जप्त केलेला केबल संबंधित कंपन्यांकडून सोडविल्या जात नाही. शिवाय त्यामध्ये तार नसते, त्यामुळे त्यांचा उपयोग इतर कामासाठीही होत नाही. त्यामुळे या केबलचे करायचे काय, असा प्रश्न विद्युत विभागापुढे निर्माण झाला आहे.

अवैध केबल तोडण्याची कारवाई सातत्याने वारंवार करण्यात येते. ज्या भागातील केबलवर कारवाई केली आहे, त्या भागातील इंटरनेट सेवा बंद होते. संबंधित कंपनीकडून पुन्हा नव्याने केबल टाकल्या जातात. कारवाई करून जप्त केलेल्या केबलचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. या केबलचा उपयोग इतर कामांसाठी होत नसल्याने याचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - दत्ता लाळगे, कनिष्ठ अभियंता स्ट्रीट लाईट, औंध 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या