शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

अहो आश्चर्यम्! विमानाचं इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा स्वस्त; नेमकं काय आहे प्रकरण पाहा तुम्हीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 19:23 IST

... तर या घडीला पेट्रोल अन् डिझेल १६ ते २० रुपयांनी स्वस्त होऊ शकते...

पुणे : कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत सापडला होता. त्यात भर म्हणजे आता दिवसागणिक होणाऱ्या इंधनातील दरवाढीने सगळेच जण पुरते हैराण झाले आहे. पेट्रोल शंभरीचा पल्ला पार करतेय की काय अशी धाकधूक मनात असताना डिझेल देखील ८५ रुपयांच्या घरात पोहचले आहे. याच पार्श्वभूमीवर जर तुम्हाला विमानाचं इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा स्वस्त आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती वाटेल. पण ही सत्य परिस्थिती आहे. विमानाचे इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा तब्बल ४०% ने स्वस्त असल्याची माहिती समोर येत आहे. काय आहे हा प्रकार पाहुयात... 

आजमितीला विमानांना लागणाऱ्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत आणि पेट्रोल आणि डिझेलवर लागणारा सेस तर बिलकूल नाही. परवाच्या केंद्रीय बजेटमध्ये जाहीर झालेला कृषी अधिभार सुध्दा फक्त पेट्रोल व डिझेलवर आकारण्यात आला आहे, जो विमानाच्या इंधनावर देखील लावला गेलेला नाही. परिणामी ट्रकच्या इंधनापेक्षा विमानाचे इंधन ४०% ने स्वस्त म्हणजे ५५ रुपये प्रति लिटर इतका आहे. त्याच धर्तीवर विकासकामांसाठी कर देण्याचा भार पेट्रोल- डिझेल वापरणाऱ्या सर्व़सामान्य नागरिकांवर आणि वाहतूकदारांवरच का लावला जातो ? विमानाने प्रवास करणारे त्यांच्यापेक्षा गरीब आहेत का ? असा सवाल सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. 

विवेक वेलणकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारचा व्हॅट विमानाच्या इंधनावर डिझेलवर लावलेल्या व्हॅट पेक्षा जास्त असूनसुद्धा दरांमध्ये ही तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान डिझेलवरील कर व अधिभार विमानाच्या इंधनावर लागणाऱ्या करांच्या पातळीवर आणणे आवश्यक आहे. पेट्रोल आणि डिझेलवर खूप टॅक्सचा भार आहे. 

साधारण पेट्रोल वर ६० रुपये तर डिझेलवर ५४ रुपयांचा कर आकारला जात आहेत. त्याप्रमाणात विमानाच्या कुठल्या  इंधनावर अधिभार लावण्यात आलेला नाही. विमानाचं इंधन स्वस्त आणि माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रक, बसेसचं इंधन महाग ही कुठेतरी विसंगती आहे असेही मत वेलणकर यांनी यावेळी व्यक्त केले.   

... तर या घडीला पेट्रोल अन् डिझेल १६ ते २० रुपयांनी स्वस्त होऊ शकते...केंद्राचा पेट्रोलवरचा टॅक्स साधारण ३३ रुपये आणि राज्य सरकारचा २७ रुपये आहे. त्यामुळे दोघांनीही हे कर कमी करायला हरकत आहे. मात्र, डिझेलच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी आहे. कारण डिझेलवर केंद्राचा तीस ते साडे एकतीस अधिभार असून राज्य सरकारचा फक्त २० रुपये आहे. त्यामुळे याबाबतीत केंद्राचा टॅक्स कमी करणे गरजेचे आहे. परंतु, गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर १६ रुपये दर वाढविले. यामुळे केंद्र आणि गेल्या वर्षभरातील वाढविलेले कर कमी दोघांनीही केले तर आज या घडीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १६ ते २० रुपयांनी स्वस्त होऊ शकतात.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

टॅग्स :PuneपुणेPetrolपेट्रोलDieselडिझेलCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारTaxकरairplaneविमान