शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
2
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
3
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
4
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
5
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
6
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
7
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
8
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
9
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
10
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!
11
५० देशांच्या जीडीपीपेक्षा BMC ची तिजोरी मोठी; पाहा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे आर्थिक गणित
12
चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला
13
BCCL IPO Allotment Status: बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
14
सरकारी कर्मचारी असा की खासगी; मतदानासाठी भर पगारी सुट्टी मिळणे कायद्याने बंधनकारक!
15
इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी?
16
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
17
एनपीएसधारकांसाठी आली गूड न्यूज, आता मिळणार 'निश्चित' पेन्शनची हमी! प्रकरण काय?
18
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
19
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
20
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

...कशी नशीबाने थट्टा आज मांडली! एसटी चालकावर चक्क 'बिगारी' काम करण्याची वेळ आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 13:19 IST

कोरोनामुळे नशिबाने मांडलेली थट्टा कधी थांबणार हा प्रश्न अद्याप निरुत्तरीतच आहे.

अमोल यादव -बारामती : सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी एसटीची सेवा मर्यादित प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे चालक,वाहकाला महिन्यात आठ दिवसच कामावर बोलविण्यात येते. बारामती एसटी आगारातील अशोक जंगले यांच्यावर कुटुंबाच्या पोटाची भूक भागवण्यासाठी सध्या गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करण्याची वेळ आली आहे. जंगले यांची कोरोनामुळे नशिबाने मांडलेली थट्टा कधी थांबणार हा प्रश्न अद्याप निरुत्तरीतच आहे. बारामती एसटी आगारातील अशोक मोतीराम जंगले मागील दहा वर्षांपासून चालक म्हणून काम करत आहेत. जंगले हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील पोकळी गावचे रहिवासी आहेत. पण नोकरीनिमित्त ते मागील दहा वर्षांपासून बारामतीमध्ये वास्तव्यास आहेत. एसटीमध्ये ते कायमस्वरूपी चालक म्हणुन कामावर आहेत. सध्या कोरोना संसर्गामुळे बऱ्याच एसटी बस बंद आहेत. त्यांना महिन्यातील आठ दिवस काम असते. 

जंगले म्हणाले, एसटीची नोकरी करताना ३५० रुपये रोज मिळतो. घरी कुटुंबात पत्नी व दोन मुले अशी चार माणसे आहेत. सध्या एसटीच्या पगारात परवडत नाही म्हणून मग काम नसेल त्यादिवशी बिगारी काम करतो. येथे ४०० रुपये हजेरी मिळते,असे जंगले सांगतात. या पगारात परवडत नसल्याने वयस्कर आई- वडिलांना गावाकडे पाठवले सांगताना त्यांना गहिवरून आले.  आम्ही एसटी क्वार्टरमध्ये राहायला होतो. तेव्हा पगारातून घरभाडे कपात होत असे. एसटी वसाहत नव्याने बांधण्यात येणार असल्याने तेथून घर सोडण्याची सुचना एसटी प्रशासनाने आम्हाला केली आहे. त्यातुन बाहेर घर मिळायला खूप त्रास झाला. भाडे देखील महिन्याच्या महिन्याला द्यावे लागत आहे. पण बिगारी हे काम जरी जड असले तरी कुटुंबासाठी हे काम करताना फार हलके वाटते, असे हसत- हसत डोळे भरून आलेल्या जंगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 दोन महिने पगार नाही पोटाला काय खाणार म्हणून बिगारी काम करत आहे. कोणत्याही कामाला लाजत नाही.  माझ्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे धान्य विकत आणावे लागते. तीन महिन्यांपूर्वी मुलाच्या दवाखान्याला व धान्यासाठी पैशांची गरज असल्याने बायकोच्या अंगावरील होते नव्हते ते दागिने मोडावे लागले. आम्हाला ड्युटीचा मेसेज व्हाट्सअप वर येतो .पण कधीकधी पैशाअभावी मोबाईल रिचार्ज केलेला नसतो. त्यावेळी मेसेज न मिळाल्याने कामाला दांडी पडते. हतबलतेचा कळस झाला,आता सहन होत नाही, असेही जंगले यांनी सांगितले.

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याBus DriverबसचालकST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारी