शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' लडिवाळ प्रेमाला पत्नीने विरोध केला; पतीने असा काही 'कहर' केला की थेट गुन्हाच दाखल झाला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 15:36 IST

पती-पत्नी दोघेच घरात राहतात. रात्री स्वयंपाक घरात फिर्यादी स्वयंपाक करीत होत्या.

ठळक मुद्देया महिलेने पतीविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा केला दाखल

पुणे : पत्नी अथवा प्रेयसी काम करत असताना पती मागून येऊन तिला लडिवाळ प्रेमाने मिठी मारतानाचे दृश्य अनेक चित्रपटात पाहिली आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला. परंतु, त्या लडिवाळ प्रेमाला पत्नीने विरोध केल्याने त्याचे रूपांतर थेट वादात झाले. अन् त्यावर चिडलेल्या पतीने मग तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत गालावर व नाकावर ठोसा मारला. हा ठोसा इतका जोरात होता की, नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला.पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.  याप्रकरणी ३४ वर्षाच्या पत्नीने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली असून तिच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ३५ वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विमाननगरमधील एअरपोर्ट रोडवरील एका उच्चभ्रु सोसायटीत २३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघेच घरात राहतात. रात्री स्वयंपाक घरात फिर्यादी स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी तिचा पती मागून येऊन तिच्याबरोबर मस्ती करु लागला. स्वयंपाक करण्यास आधीच उशीर झाला असताना त्यात पतीमध्ये येऊन लुडबुड करु लागल्याने फिर्यादी हिने त्याला विरोध केला. त्यावर चिडलेल्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. त्यातून त्यांच्यात वाद सुरु झाला. तेव्हा पतीने तिला शिवीगाळ करुन गालावर व नाकावर जोरात ठोसा मारला. हा ठोसा इतका जोरात होता की, तिच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तेव्हा घाबरलेल्या पतीने तिला हॉस्पिटलमध्ये नेले़ तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान कशामुळे हा प्रकार घडला हे सांगितले. तेव्हा हॉस्पिटलमधून पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आले. पोलिसांनी येऊन चौकशी केली. उपचारानंतर बरे झाल्यावर या महिलेने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी पतीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला