शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलीस एफबीआयकडे कुठली हार्डडिस्क देणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 14:23 IST

कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणी आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप

ठळक मुद्देअर्धवट आरोपपत्र : पंचनाम्यात कोणत्याही हार्डडिस्कचा उल्लेख नव्हता.. थेट फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन या अमेरिकन तपास संस्थेची मदत घेणार एफबीआयची मदत घेतली जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धक्लोन कॉपीची सत्यता पडताळण्यासाठी आरोपींनी तज्ज्ञ नेमावा, असे कोर्टाने निर्देश

पुणे : कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणी आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या आरोपींकडून जप्त केलेल्या साहित्यात कोणत्याही तुटलेल्या हार्डडिस्कचा उल्लेख नव्हता. यामुळे पुणे पोलीस कोणती हार्डडिस्क फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) कडे तपासासाठी देणार आहेत हे सरकार पक्षाने स्पष्ट करावे, असा अर्ज सोमवारी बचाव पक्षाने कोर्टात केला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. वरवरा राव यांच्या घरातून जप्त करण्यात आलेला हार्ड डिस्कचा डेटा पुन्हा मिळवण्यासाठी पुणे पोलीस आता थेट फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) या अमेरिकन तपास संस्थेची मदत घेणार आहेत. वरवरा राव यांच्या घरी पोलिसांनी छापा मारून काही हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या. मात्र, यातील डेटा डिलीट करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने आता हा डेटा मिळवण्यासाठी एफबीआयची मदत घेतली जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. आरोपींच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या साहित्यात कोणत्याही तुटलेल्या हार्डडिस्कचा उल्लेख नाही. पोलिसांनी केलेल्या जप्तीच्या पंचनाम्यामध्येही तुटलेल्या हार्डडिस्कचा उल्लेख नाही. ही हार्डडिस्क कोठून आली हे सरकार पक्षाने स्पष्ट करावे, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. या अर्जावर सरकार पक्षातर्फे १३ जानेवारी रोजी म्हणणे मांडण्यात येणार आहे. तसेच याप्रकरणात आरोपींना देण्यात येणाऱ्या क्लोन कॉपीची सत्यता पडताळण्यासाठी आरोपींनी तज्ज्ञ नेमावा, असे कोर्टाने निर्देश दिले होते. त्यासाठी कोर्टाने आरोपींना मुदतवाढ दिली आहे.याप्रकरणात सोमवारी आरोपींविरुद्ध आरोपनिश्चिती होण्याची शक्यता होती. याप्रकरणात कोर्टाने पुढील तारीख दिली असून १३ जानेवारी रोजी यावर  सुनावणी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणात सोमवारी बचाव पक्षातर्फे कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला असून, तुटलेल्या हार्डडिस्कबाबत खुलासा करण्यात यावा, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी कवी वरवरा राव यांच्यातर्फे सोमवारी अ‍ॅड. राहुल देशमुख, अ‍ॅड. पार्थ शहा यांनी अर्ज दाखल केला. .........तर मग पोलिसांनी संशयितांना अर्धवट आरोपपत्र का दिले?एल्गार प्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यातही हार्डडिस्क तुटलेला उल्लेख नाही. एल्गार प्रकरणाचा जेव्हा तपास सुरू होता, तेव्हा जप्त करण्यात आलेली हार्डडिस्क तुटलेली होती, असा आजवर कोठेही उल्लेख नव्हता. पोलीस एका ठिकाणी संपूर्ण जप्त डाटाच्या क्लोन कॉपी दिल्याचे सांगत असताना दुसरीकडे हार्डडिस्क तुटल्याचे ते सांगत आहे. तसे जर असेल तर पोलिसांनी मग संशयित आरोपींना मग अर्धवट आरोपपत्र दिले का ? हे देखील स्पष्ट करण्याची गरज आहे. अर्धवट आरोपपत्र दिले असेल, तर सर्वांना कायद्याने जामीन मिळण्याचा अधिकार आहे.    - अ‍ॅड. रोहन नहार, बचाव पक्षाचे वकील........

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारCourtन्यायालयPoliceपोलिस