शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 20:25 IST

गेल्या ५ दिवसांत गौतम गायकवाडसोबत नेमकं काय झालं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.

मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला २४ वर्षीय तरुण गौतम गायकवाड अखेर सिंहगडाच्या दरीत जखमी अवस्थेत सापडला अन् त्यांच्या कुटुंबाच्या जिवात जीव आला. मात्र, गेल्या ५ दिवसांत गौतमसोबत नेमकं काय झालं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पुण्यातील सिंहगडाच्या तानाजी कड्याजवळ तो पाच दिवसांपासून दरीत अडकून पडला होता. त्याच्या शरीरावर अनेक जखमा असून, सध्या त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गौतमसोबत नेमकं काय घडलं?हैदराबादहून पुण्यात फिरायला आलेल्या गौतमने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेलो होतो. त्यावेळी लघुशंकेसाठी मी बाजूला गेलो असता, मला तानाजी कड्याजवळ एका ठिकाणी एक कुत्रा अडकलेला दिसला. त्याला वाचवण्यासाठी खाली उतरत असताना माझा पाय घसरला आणि मी दरीत कोसळलो.'

दरीचा कडा सरळ असल्याने त्याला पुन्हा वर चढता आले नाही. त्याने मदतीसाठी खूप ओरडण्याचा प्रयत्न केला, मात्र जोरदार पाऊस सुरू असल्याने त्याचा आवाज कोणापर्यंतच पोहोचला नाही. त्यामुळे त्याला त्याच अवस्थेत दरीत राहावे लागले, असे गौतम म्हणाला.

पाच दिवस उपाशी आणि जखमी अवस्थेत होता गौतमदरीमध्ये पडल्यानंतर त्याला एका सुरक्षित ठिकाणी झोप लागली. जाग आल्यावर त्याला काहीच दिसत नव्हते. तो हळूहळू पुढे सरकत गेला. जवळपास पाच दिवस त्याला अन्न किंवा पाणी मिळाले नाही. अखेर पाच दिवसांनी त्याला काही लोकांचा आवाज आला. आवाज येत असलेल्या दिशेने तो स्वतःहून चालत गेला. त्यावेळी त्याला दोन लोक दिसले. त्यांनी त्याला पाहिले आणि मदत केली.

सुरुवातीला गौतमने कर्जाच्या समस्येमुळे बेपत्ता होण्याचा बनाव रचल्याची चर्चा होती. सीसीटीव्ही फुटेजमुळे या संशयाला आणखी बळकटी मिळाली होती. मात्र, गौतमने स्वतः सांगितलेली ही थरारक कहाणी समोर आल्याने हा सगळा प्रकार नेमका काय होता, हे स्पष्ट झाले आहे. पाच दिवसांनी गौतम जिवंत सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाPuneपुणेAccidentअपघात