शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

राजमुद्रेचा गैरवापर करणाऱ्ऱ्यांवर काय कारवाई ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:20 PM

अखिल भारतीय मानवाधिकार संघटना राजमुद्रेचा आणि नावाचा गैरवापर करीत असल्याचे समोर आाले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही बाब डिसेंबर २०१२ साली निदर्शनास आणून दिली होते.

ठळक मुद्देया कारवाईचा अहवाल येत्या १९ एप्रिलला सादर करण्याचा आदेश

पुणे : राजमुद्रेचा गैर वापर करणाऱ्या  ह्युमन राईट्स असोसिएशनच्या पुणे शाखेवर पोलिसांनी काय कारवाई केली याची विचारणा महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने पुणे पोलिसांकडे केली आहे. तसेच, या कारवाईचा अहवाल येत्या १९ एप्रिलला सादर करावा असे आदेशही आयोगाचे अध्यक्ष भगवंतराव मोरे यांनी दिले आहेत. अखिल भारतीय मानवाधिकार संघटना राजमुद्रेचा आणि नावाचा गैरवापर करीत असल्याचे समोर आाले होते. राजमुद्रा, लोकसेवा अदालत आणि इतर चिन्हांचा वापर करीत असल्याची बाब उघड झाली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही बाब डिसेंबर २०१२ साली उघड केली होती. पुणे पोलिसांनी संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट आपल्याला त्रास दिल्याची तक्रार खान यांनी मुंबईच्या राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली.  त्यात पोलिसांनी तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची कोणतीही खातरजमा केली नाही. उलट तक्रारदारालाच बोलावून त्याची गरज नसताना चौकशी करण्यात आली. त्याचा अर्थ पोलिसांनी तक्रारदारांनाच त्रास दिल्याचे दिसून येते. सहायक पोलिस आयुक्त समीर शेख सुनावणीला उपस्थित होते. आयोगाने त्यांना राजमुद्रेचा गैरवापर करणाऱ्ऱ्यांवर पोलिसांनी त्यावर काय कारवाई केली याची माहिती देण्याची सूचना केली. या कारवाईचा अहवाल १९ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत सादर करावा असेही आयोगाने स्पष्ट केले.  माहिती अधिकार कार्यकर्ते खान म्हणाले, मानवाधिकार संघटनेला राजमुद्रेचा वापर करता येत नाही. ही बाब माहिती अधिकारात उघड केली होती.  मात्र, पुण्यातील मानवाधिकार संघटना राजमुद्रेचा गैरवापर करीत होती. त्या प्रकरणी २०१२ साली पुणे पोलिसांकडे तक्रार केली. संबंधितां ऐवजी माझीच चौकशी करीत मला पोलिसांनी त्रास दिला. त्या प्रकरणी मानवाधिकार आयोगाकडे २०१३ साली तक्रार केली. त्यावर ६ मार्चला सुनावणी झाली. त्यात पोलिसांना संबंधितांवर काय कारवाई केली याची विचारणा आयोगाने केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस