बिबवेवाडीत युवकावर वार करुन गुंडाचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 05:47 PM2020-02-05T17:47:31+5:302020-02-05T17:49:17+5:30

‘‘कोणाच्या अंगात दम असेल त्यांनी पुढे या. त्यांचे तुकडे तुकडेच करतो’’, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली

Weopan attack on youth in bibwewadi | बिबवेवाडीत युवकावर वार करुन गुंडाचा राडा

बिबवेवाडीत युवकावर वार करुन गुंडाचा राडा

Next
ठळक मुद्दे फिर्यादी याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना लाथाबुक्यांनी मारहाण

पुणे : तळजाई परिसरात दारु पिऊन वाहनांची तोडफोड करण्याच्या प्रकारानंतर सराईत गुन्हेगारांनी बिबवेवाडीत राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर का राहतो, असा जाब विचारुन गुंडांच्या टोळक्याने युवकावर धारधार शस्त्राने वार करुन जखमी केले. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
तळजाई परिसरात रविवारी गुंडांनी दहशत पसरवत ५० वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार झाल्यानंतर आता बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता गुंडांनी राडा घातला.बिबवेवाडी पोलिसांनी ६ गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे.
सनी जाधव, काळा गाडे, बाळ्या गाडे (तिघे रा. चैत्रबन वसाहत, अप्पर बिबवेवाडी), सनी शिंदे (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी), कुंदन शिंदे (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी), बाव्या पंधेकर (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शनी जाधव, काळा गाडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी बिबवेवाडी येथील १७ वर्षाच्या युवकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याच्या मित्राच्या वाढदिवसासाठी सोमवारी रात्री साडेआठ वाजता जात असताना अप्पर डेपो येथील शेवटचा बसस्टॉपजवळ या गुंडांनी त्याला अडविले.  ‘‘अतुल जाधव, रणजित सांवत यांच्याबरोबर तु का राहतो.थांब तुला खल्लासच करतो’’ अशी धमकी देऊन सनी शिंदे व बाव्या पंधेकर याने त्यांच्याकडील शस्त्राने फिर्यादीवर वार करुन त्याला जखमी केले. फिर्यादी याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. भर रस्त्यात सुरु असलेला हा प्रकार पाहून लोक जमा झाले. तेव्हा तेथे जमलेल्या लोकांना हत्यार दाखवून ‘‘कोणाच्या अंगात दम असेल त्यांनी पुढे या. त्यांचे तुकडे तुकडेच करतो’’, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. त्यामुळे लोकांनी पुढे येण्याचे धाडस केले नाही. गुंड पळून गेल्यानंतर फिर्यादीच्या साथीदारांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Web Title: Weopan attack on youth in bibwewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.