शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

खडकी येथे भर रस्त्यावर पत्नीवर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 21:49 IST

सहा वर्षापूर्वी दोघांची ओळख झाली होती़. त्यांनी आळंदी येथे २०१५ मध्ये विवाह केला होता़.

ठळक मुद्दे खडकी परिसरातील घटना : पती अटक

पुणे: कौटुंबिक वादातून भररस्त्यावर पत्नीवर कोयत्याने वार करुन तिला गंभीर जखमी करण्यात आले़. खडकीपोलिसांनी पतीला अटक केली आहे़. ही घटना खडकी बाजार येथील बिझनेस सेंटरमधील महाराष्ट्र बँकेच्या बाहेर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली़ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. प्रविण लक्ष्मण हांडे (रा़ कालेसोड, ता़ वेल्हे) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे़. याप्रकरणी प्रियदर्शनी एकनाथ ओव्हाळ (वय ३०, रा़ भाऊ पाटील रोड, दापोड) यांनी फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडे आणि प्रियदर्शनी हे पतीपत्नी आहेत़. सहा वर्षापूर्वी दोघांची ओळख झाली होती़. त्यांनी आळंदी येथे २०१५ मध्ये विवाह केला होता़. तेव्हापासून दोघेही हांडे याच्या मुळ गावी रहात होते़. मात्र, २०१७ मध्ये दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरुन वाद विवाद होऊ लागले़. तेव्हा प्रियदर्शनी या आईकडे बोपोडीत रहायला आल्या आहेत़. प्रविण हांडे हा वारंवार त्यांच्या घरी येऊन सोबत राहण्यास येण्याविषयी सांगत होता़ त्यावरुन त्यांच्याशी भांडण होता़. प्रियदर्शनी, तिची आई व बहिण असे तिघी जणी मंगळवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र बँकेच्या शाखेत आईची पेन्शन काढण्यासाठी आल्या होत्या़. बँकेत गर्दी असल्याने आत आई रांगेत उभी होती़. त्या बहिणीबरोबर बाहेर बोलत उभ्या होत्या़. त्यावेळी प्रविणही तेथे आला़. त्याने आपल्या पत्नीला तु माझ्या सोबत का आली नाही, असे म्हणून त्याने तिच्या डोक्यात कोयत्याने वार केला़. ती जागेवरच कोसळली़. त्यानंतरही त्याने थांब आता तुला संपवूनच टाकतो, असे म्हणून त्याने प्रियदर्शनी हिच्या मानेवर पुन्हा वार केला़. प्रवीण हांडे हा कार्ले येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो़ खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :KhadkiखडकीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस