शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास! भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलेंडर, वाचवले २५ कोरोना रुग्णांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 13:56 IST

लग्नासाठी ३ लाख ५० हजार खर्च करण्याचा होता विचार

ठळक मुद्देऑक्सिजन सिलेंडरची संख्या १०० वर पोहोचवण्याचा मानस

पुणे: पुण्यात कोरोनाची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक २,३ हजारांच्या संख्येत रुग्ण आढळून येत आहेत. तर ५०, ६० रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांना अडचणी येऊ लागल्या आहेत. दुसऱ्या लाटेत अनेकांना ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे राज्यासहित अनेक जिल्ह्यातही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण काळात लोहगावातील तरुणांनी पुढाकार घेत रुग्णांपर्यंत प्राणवायू पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. सामान्य रुग्णाबरोबबरच गंभीर, अत्यवस्थ अशांनाही हे तरुण ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य करू लागले आहेत. 

लोहगाव येथील प्रशांत जगताप या तरुणाने स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली आहे. त्याच्याबरोबर अविनाश पोथवडे, सौरभ जगताप, दत्तात्रय जाधव, विश्वजित पोतेकर हे सर्वही या उपक्रमात सहभागी झाले आहेत. 

मागच्या आठवड्यात प्रशांत जगताप यांचा भाऊ सौरभ जगतापचे लग्न होते. त्याच्या लग्नासाठी ३ लाख ५० हजार खर्च करण्याचा विचार होता. पण सध्याची परिस्थिती पाहून हे पैसे समाजउपयोगी कामासाठी वापरावेत असे ठरवले. त्यांनी या पैशातून ऑक्सिजनचे ३६ सिलेंडर विकत घेतले. नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांना २५ रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. काही दिवसांपूर्वी प्रशांत जगताप यांची आत्या कोरोनामुळे गंभीर अवस्थेत होती. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यावेळी जगताप यांनी खूप प्रयत्न करूनही बेड मिळत नव्हता. अखेर उशीर झाल्याने आत्याने प्राण सोडला. म्हणून लोकांनाही अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो. या उद्देशाने हा उपक्रम चालू केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

सिलेंडरची संख्या १०० वर पोहोचवण्याचा मानस 

पुण्यात अजूनही कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. आता आमच्याकडे ३६ सिलेंडर आहेत. काही संस्थांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. सिलेंडर घेण्यासाठी त्यांनी आर्थिक साहाय्य करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ३६ हा आकडा लवकरच १०० किंवा त्यापेक्षा जास्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनGovernmentसरकार