कचरा प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:23+5:302020-12-05T04:16:23+5:30
गेल्या पंधरा वर्षांत पुणेकरांच्या कराचे हजारो कोटी रुपये खर्च करून पालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले. तरीही पुण्याचा कचरा ...

कचरा प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत
गेल्या पंधरा वर्षांत पुणेकरांच्या कराचे हजारो कोटी रुपये खर्च करून पालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न संपलेला नाही. अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. तर काही प्रकल्प अत्यंत कमी क्षमतेने सुरू आहेत. कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा आढावा घेण्याचा निर्णय स्थायी समितीने नुकताच घेतला आहे. प्रशासकिय कामाचा अनुभव पाहता हे काम ते वेळेत आणि परिपूर्ण करण्याची शक्यता कमी आहे. आढावा घेतल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल तत्काळ पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.