शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

संचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 18:04 IST

संचारबंदीमुळे घरातच कैद होण्यातील तोटे आता समोर येऊ लागले आहेत. त्यातला सर्वात मोठा तोटा वाढत्या वजनाचा. ते आटोक्यात कसे ठेवावे.याविषयी काही तज्ञांच्या टिप्स....

ठळक मुद्देखाण्याविषयी जागरूक राहणेच गरजेचे अगदी थोड्या आणि सोप्या प्रयत्नांमधूनही आपले वजन आपण ताब्यात ठेवू शकतो

पुणे: कोरोनामुळे लादण्यात आलेल्या संचारबंदीचे तोटे आता पुढे येऊ लागले आहेत. शारीरिक हालचाल बंद आणि खाणे जास्त होऊ लागल्याने वजन वाढले जात अनेकांसमोर ही समस्या निर्माण होत आहे.

फिटनेस तज्ञ मनाली मगर : व्यायाम म्हणजे काही कष्टकरी क्रिया असा अनेकांचा समज आहे. मात्र अगदी थोड्या आणि सोप्या प्रयत्नांमधूनही आपले वजन आपण ताब्यात ठेवू शकतो, ते कमी होत नसले तरी वाढतही नाही व आताच्या काळात त्याचीच गरज आहे.* काय करावे: सकाळी ऊठताना पटकन ऊठून कामाला लागू नका. शांतपणे बसा, कायकाय करायचे आहे त्याणी मनातच यादी करा. याने मन शांत होईलआवरून झाले की मांडी घालून स्वस्थ बसा. एक नाकपूडी बंद करायची, दीर्घ श्वास घ्यायचा व दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. एरवी आपण श्वास खोलपर्यंत जाऊच देत नाही. यात तो थेट पोटापर्यंत जाऊ द्यायचा व नंतरच सोडायचा. असे किमान २७ वेळा करायचे. मन शांत होईलयानंतर सूर्य नमस्कारासारखा व्यायाम किंवा अगदी शाळेत शिकला असाल ती पीटी केली तरी चालेल, मात्र त्यात नियमितता हवी. शरीराला काही एक ताण पडायला हवा. रोजच्या कामांमधून महिलांना हा व्यायाम होऊ शकतो, पण पुरूषांचे तेही होत नाही. त्यामुळे रोजचे चालणे, काही कामे करणे यातूनही व्यायाम होईल. अधिक ताण द्यायचा तर जीम करायला हवे किंवा व्यायाम प्रकार वाढवायला हवे.....................................................

.

आहारतज्ञ विभूषा जांभेकर: घरात बसून जास्त.खाल्ले जाते, नको तेच खाल्ले जाते व त्यातून वजन वाढते. या काळात खाण्याविषयी जागरूक राहणेच गरजेचे आहे, तरच वजन नियंत्रणात राहू शकते.

* काय करावे: रोजच्या जेवणातील किमान ४० टक्के आहार हा कच्चा असावा. म्हणजे वाफवलेली कडधान्ये, इतकेच नाहीतर गाजर, काकडी, सँलड अशा गोष्टीही कच्च्याच खाव्यात. खाताना कधीही टीव्ही मोबाईल याचा वापर करू नये. पोट भरले.हा संदेश मेंदूपर्यंत जाण्याच्या क्रियेत यामुळे अडथळा येतो व त्यातून खाणे वाढते.* शरीराला हालचाल नाही तर साखर शक्यतो आहारात येऊच देऊ नये. गोडाची आवडच असेल तर खजूराचा किस, खारकेची पूड अशी नैसर्गिक साखर खावी.तेलकट, तळलेले, ब्रेड, पाव याचा अतिरेक टाळला नाही तर वजन वाढणारच हे नक्की आहे. त्यामुळे या गोष्टी आहारात नकोच. त्याऐवजी सर्व कडधान्याची मिसळ, त्यावर कांदा लिंबू किंवा बाजरी ज्वारी यालाही मोड येतात, ते भिजवून त्याची खिचडी असे पदार्थ करावेत. 

* दोन वेळा जेवण, दोन वेळच्या खाण्यात किमान ६ तासांचे अंतर या लहानलहान गोष्टींमधूनही वजन आटोक्यात ठेवणे शक्य आहे असा विश्वास जांभेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न