शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

'बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे', बॅनर लावणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:48 IST

'कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल, तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं'', असा मजकूर बॅनरवर देण्यात आला होता

पुणे : खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव देण्यात यावे या मागणीनंतर राजकारण ढवळून निघाले. पुण्यातील उद्धव  बाळासाहेब ठाकरे गटाने अनेक ठिकाणी कुलकर्णी यांच्यावर टीका करणारे बॅनर लावले आहेत. ''कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं'', असा मजकूर या बॅनरवर देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या या मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला होता. या बॅनरवर नावे असणाऱ्या कार्यकर्त्यांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. 

बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा असे फ्लेक्स झळकवणाऱ्या तिघांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश गायकवाड, अतुल दिघे, विलास सोनवणे अशी त्यांची नावे आहेत. डेक्कन पोलीस ठाण्यात कमलेश प्रधान या व्यक्तीने याबाबत तक्रार दिली आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे बॅनर झळकवण्यात आले होते. कोथरूडच्या बाई तुम्हाला एवढीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा असा मजकूर फ्लेक्स वर होता.  फ्लेक्स झळकवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम ३ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय म्हणाल्या कुलकर्णी? 

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे.. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे.. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केले आहे.. या कामात बाजीराव पेशवे यांची देखील योगदान मोठे आहे.. थोरली बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही.. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात.. त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात.. छत्रपती शिवरायांचा वारसा यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा कुरली बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेmedha kulkarniमेधा कुलकर्णीBJPभाजपाPoliticsराजकारणpune railway stationपुणे रेल्वे स्थानकShiv Senaशिवसेना