बुधवारी ६८३ कोरोनाबाधितांची वाढ : १ हजार १५८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:11 IST2021-05-27T04:11:25+5:302021-05-27T04:11:25+5:30
पुणे : शहरात बुधवारी ६८३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १ हजार १५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ...

बुधवारी ६८३ कोरोनाबाधितांची वाढ : १ हजार १५८ कोरोनामुक्त
पुणे : शहरात बुधवारी ६८३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १ हजार १५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर झालेल्या ८ हजार ७५१ तपासण्यांमध्ये कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ७़ ८० टक्के इतकी आहे़ शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८ हजार ३५६ इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज ४७ जणांचा मृत्यू झाला़ यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील असून आजचा मृत्यूदर हा १़ ७३ टक्के इतका आहे़
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या २ हजार १२४ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर गंभीर रुग्णसंख्याही १ हजार २० इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २४ लाख ६० हजार ५१६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६७ हजार ५४१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ५१ हजार ७० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आतापर्यंत शहरात ८ हजार ११५ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------