धामणी येथे लग्नाची मिरवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:10 IST2021-03-31T04:10:44+5:302021-03-31T04:10:44+5:30

आंबेगाव तालुक्यात कोरोणा रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता लग्नाच्या कार्यक्रमात पंचवीस ते ...

Wedding procession at Dhamani, case filed against both | धामणी येथे लग्नाची मिरवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

धामणी येथे लग्नाची मिरवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

आंबेगाव तालुक्यात कोरोणा रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता लग्नाच्या कार्यक्रमात पंचवीस ते तीस लोकांना एकत्र आणून बैलगाड्यांची मिरवणूक काढल्याप्रकरणी धामणी येथील बापूसाहेब तुकाराम जाधव व आकाश बापूसाहेब जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

धामणी येथील बापूसाहेब तुकाराम जाधव व आकाश बापूसाहेब जाधव यांनी शासनाचा आदेश डावलून 29 मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास धामणी येथील गावात आकाश जाधव याच्या लग्नानिमित्त मांडवाच्या कार्यक्रमानिमित्त बैलगाड्यांची मिरवणूक काढली. यावेळी पंचवीस ते तीस लोक एकत्र राहून मिरवणुकीचा कोणताही परवाना नसताना मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक गणेश डावखर यांनी तक्रार दिली आहे. तपास पोलीस नाईक तानाजी हगवणे करत आहे.

Web Title: Wedding procession at Dhamani, case filed against both