शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनचा तब्बल ६ टक्क्यांनी हवामान विभागाचा अंदाज चुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 19:48 IST

भारतीय हवामान विभागाने दीर्घ कालावधीसाठी जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाचा अंदाज ९७ टक्के व्यक्त केला होता़ प्रत्यक्षात पाऊस ९१ टक्के पडला असून हवामान विभागाचा हा अंदाज तब्बल ६ टक्क्यांनी चुकला आहे.

पुणे : भारतीय हवामान विभागाने दीर्घ कालावधीसाठी जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाचा अंदाज ९७ टक्के व्यक्त केला होता़ प्रत्यक्षात पाऊस ९१ टक्के पडला असून हवामान विभागाचा हा अंदाज तब्बल ६ टक्क्यांनी चुकला आहे. ईशान्य भारतात सर्वात कमी पाऊस झाला असून या भागाचा अंदाज तब्बल १७ टक्क्यांनी चुकला आहे.     मान्सूनच्या चार महिन्यात भारतात पडणाºया सरासरी पावसापेक्षा यंदा ९ टक्के पाऊस कमी पडला़ त्यामुळे देशाच्या अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती असून उत्तर भारत, मध्य भारतात असंख्य जिल्ह्यात दुष्काळग्रस्त झाले आहेत. मान्सूनच्या चार महिन्यातील पावसाचा आढावा हवामान विभागाने रविवारी जाहीर केला़ त्यात हवामान विभागाने हा अंदाज केवळ संपूर्ण भारतासाठी आणि चार व्यापक विभागासाठी दिलेला होता़ राज्य पातळी किंवा जिल्हास्तरीय दीर्घकाळाचा अंदाज जाहीर केला जात नाही़ त्यासाठी सध्या पुरेसे कौशल्य उपलब्ध नसल्याची जाहीर कबुली दिली आहे़ ईशान्य भारतात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़ प्रत्यक्षात ७६ टक्के पाऊस पडला़ तसेच मध्य भारतात ९९ टक्के पावसाचा अंदाज होता़ प्रत्यक्षात ९३ टक्केच पाऊस पडला.        महाराष्ट्र हा मध्य भारताचा भाग असल्याने त्याचा स्वतंत्र अंदाज जाहीर केला जात नाही़ महाराष्ट्रात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला़ सर्वात कमी पाऊस मराठवाड्यात पडला असून तेथे सरासरीच्या २२ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यात बहुतांश मराठवाड्यातील जिल्हे आहेत़ इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वसाधारण पाऊस पडला आहे़ एखाद्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा १९ टक्के कमी अथवा अधिक पाऊस पडला तर तो हवामान विभागाच्या दृष्टीने सर्वसाधारण मानला जातो़ १९ टक्क्यांपेक्षा अधिक किंवा कमी झाला तर जादा किंवा कमी पाऊस म्हटले जाते. बी बियाणे व खतांच्या कंपन्यांचा फायदा व्हावा, यासाठी हवामान विभागाकडून जाणीवपूर्वक चांगला पाऊस होईल, असे वृत्त दिल्या जात असल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे़ या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान