शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

हवामानाचा डाटा आता मोबाईलद्वारे होणार संकलित, आयएमटीचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:33 IST

हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे़. सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़.

ठळक मुद्देजागतिक हवामान दिन विशेषअचूक अंदाजासाठी होणार मदत बंगळुरूच्या नॅशनल एरोस्पेस लॅबबरोबर हवामान विभागाचा करार

पुणे : भारतासारखा लहरी हवामान असलेल्या ठिकाणाच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी अधिक अचूक डाटा अत्यावश्यक असतो़. हा डाटा कोणत्याही अडथळ्याशिवाय नियमितपणे उपलब्ध व्हावा, यासाठी हवामान विभाग आता त्यांच्या सर्व स्वयंचलित हवामान केंद्रातील माहितीचे संकलन जीपीआरएस बेस असलेल्या मोबाईलद्वारे करणार आहे़. त्यामुळे त्यातील मानवी हस्तक्षेप कमी होऊन अधिक विश्वसनीय माहितीचा साठा उपलब्ध होणार आहे़. त्यामुळे हवामानाचा अधिक अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे़ .हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे़.तसेच देशभरात १३५० पर्जन्यमापन केंद्रे आहेत़.या ठिकाणी वातावरणाची आर्द्रता, हवेचा वेग, जमीन तापमान अशी माहिती दर तीन तासांनी घेतली जाते़ . सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़. यातील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यात सातत्य राहावे, यासाठी आता या सेंटरमध्ये मोबाईल चीप बसविण्यात येणार आहे़ .त्याद्वारे दर तीन तासांनी संकलित झालेला डाटा हा थेट पुण्यातील हवामान केंद्रामधील संगणकावर उपलब्ध होणार आहे़. या प्रकल्पाची सुरुवात झाली असून, मार्च २०१९पर्यंत तो पूर्ण होणार आहे़ . हा डाटा उपलब्ध झाल्याने कृषी व सर्वसाधारण हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात अधिक अचूकता येणार असल्याची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ मनीष रनाळकर यांनी दिली़. 

......................किनारपट्टीवर हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम...भारतातील किनारपट्टीवर नेहमीच चक्रीवादळाचा धोका असतो़. या काळात वाऱ्यांचा वेग सर्वाधिक असतो़. चक्रीवादळात अनेकदा घरे,  वृक्ष उन्मळून पडतात़ अशावेळी वाऱ्याच्या वेगाची अचूक मोजणी व्हावी, यासाठी हवामान विभागाने हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम विकसित केली आहे़. सध्या ही पूर्व किनारपट्टीवरील १९ ठिकाणी लावण्यात आली आहे़ .पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरील ७० जिल्ह्यांत ही सिस्टिम एका वर्षात लावण्यात येणार आहे़ ................विमानतळावर दृष्टी सेन्सर...विमानतळावर विमानांच्या उड्डाण व उतरतेवेळी वैमानिकांना तेथील हवामानाची अचूक माहिती मिळणे तसेच धावपट्टीवरील दृश्यमानता नेमकी किती आहे,याची माहिती महत्त्वाची असते़. यासाठी हवामान विभागाने दृष्टी सेन्सर बनविले आहे़ . त्यासाठी बंगळुरूच्या नॅशनल एरोस्पेस लॅबबरोबर हवामान विभागाचा करार झाला आहे़. देशातील विमानतळापैकी २० विमानतळांवर सध्या हे सेन्सर बसविण्यात आले असून, या वर्षभरात आणखी २० ठिकाणी असे सेन्सर बसविण्यात येणार आहेत़ .

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMobileमोबाइल