शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलावर शस्त्राने वार करून विहिरीत फेकले; बारामती शहरातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 11:35 IST

आरोपीने मुलाच्या गळ्यावर,मानेवर धारदार हत्याराने वार करत त्यास विहिरीत ढकलून खून करण्याचा प्रयत्न केला.

बारामती : बारामती शहरात 16वर्षीय अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करून विहिरीत फेकून दिल्याची घटना शुक्रवारी (दि 10) सायंकाळी घडली. याप्रकरणी सलीम मुनिर कुरेशी (वय 45, रा. कसाबगल्ली,बारामती ता.बारामती जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार आरोपी आयुब गुलाब कुरेशी ( रा कसाबगल्ली,बारामती ता बारामती जि.पुणे.) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आरोपीला अटक करण्यात आली आहे .लॉकडाऊन काळात घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे .पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बुरुडगल्ली येथील काटयात आड या विहिरीजवळ हा प्रकार घडला.आरोपी फिर्यादीच्या घराशेजारी वास्तव्यास आहे. आरोपीने अज्ञात कारणावरुन  कैफ कुरेशी यास बाहेर जावुन येवु असे म्हणुन त्यास त्याचे बरोबर घेऊन गेला . त्यानंतर त्याला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने विहिरीजवळ नेले .या ठिकाणी आरोपीने कैफ याच्या गळ्यावर ,मानेवर धारदार हत्याराने वार केले .वार केल्यानंतर त्यास विहिरीत टाकुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे . अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करत आहेत .

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस