शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

नयनतारांना विरोध करणाऱ्यांविरुद्ध ‘हम बोलेंगे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 01:24 IST

समाजवादी कार्यकर्ते एकत्र : भाषणाचे जाहीर वाचन

पुणे : भारतीय लोकशाही यंत्रणेला उद्ध्वस्त करण्याचे काम चालू आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा चेपून लोकशाही कमी होऊन हुकूमशाही वाढत आहे. राजकीय लोक धर्म व जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. साहित्य, लेखन, विचार, बोलणे अशा स्वातंत्र्यात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे विचार असणाºया ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या विचारांचे भाषण दाबले गेले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमंत्रण आणि साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाच्या बंधनाचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे मत पुरोगामी आणि परिवर्तनवादी, तसेच समाजवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन आणि लोकशाही उत्सव समिती आयोजित नयनतारा सहगल यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाचे जाहीर वाचन आणि अभिव्यक्ती चर्चा या हम बोलेंगे कार्यक्रमात हे सर्व बोलत होते. यावेळी स्त्रीवादी विद्या बाळ, काँग्रेसनेते अभय छाजेड, ज्येष्ठ कलावंत अतुल पेठे, साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी आपले विचार मांडले.राजकरणात वेगळ्या प्रकारची रणनीती चालू झाली आहे. साहित्य संमेलनाचे संयोजक नयनतारा यांना बोलून देत नाहीत. हे एवढ्या खालचे पातळीचे आहेत का? सहगल यांचे आमंत्रण रद्द केले. त्यांच्या या विचारांना दाबले गेले याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे विचार पुरोगामी आणि परिवर्तनवादी चर्चेतून मांडले गेले. काँग्रेसनेते अभय छाजेड म्हणाले, नयनतारा यांच्या संवेदनशील भाषणाने सामान्य जनतेवर एवढा प्रभाव पडेल वाटले नव्हते. असे विचार या ठिकणी ऐकायला मिळाले याचे कौतुक वाटते. साहित्य संमेलन हे हिंदी, इंग्रजी, मराठी चॅनल वर दाखवले जात नव्हते. पण या गोष्टीमुळे त्याची सर्व ठिकाणी चर्चा झाली. एक विद्वान पंडितांच्या मुलीने हे लेखन केले आहे.सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय...अतुल पेठे म्हणाले, की कलावंत हे समाजातील सर्व प्रकारच्या गोष्टींची आपल्या साहित्य, लेखन याच्याशी तुलना करत असतात. नयनतारासुद्धा या कलाकारांप्रमाणे आपली भूमिका लेखणीतून सर्वांसमोर मांडत आहेत. लोकशाहीवर विश्वास ठेवणारे कलावंत होतात. हुकूमशाहीवर विश्वास ठेवणारे हमाल होतात. सांस्कृतिक दहशतवाद वाढत आहे.स्त्रीला नाकारल्याने नाक कापलेय...आपण पाकिस्तानशी युद्ध करायचा विचारही करू नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे रद्द होण्यामागे माझा काही हात नाही असे सांगतात. ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने फारच लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्या स्त्रीला नाकारता तेव्हा तुमचे नाक कापले गेले हे त्यांना कसे कळाले नाही, असे विद्या बाळ यांनी सडकून टीका केली.साहित्य संमेलनात येणाºया प्रत्येक माणसाला नयनतारा माहीतच होत्या असे नाही. त्यांचे आमंत्रण रद्द झाले तरी मी जाणार होते. नागरिकांना नयनतारा कोण आहेत, याची ओळख करून देणार होते. पण हे आमंत्रण रद्द झाले व भाषणही होऊन दिले नाही. ही फारच लाजिरवाणी गोष्ट वाटली म्हणून मी गेले नाही.- विद्या बाळ

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनPuneपुणेSocial Mediaसोशल मीडिया