शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

'जाणीवपूर्वक अशा घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही', यवतच्या तणाव परिस्थितीवरून फडणवीसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:31 IST

तणाव संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे

पुणे (यवत) : यवतमध्ये सकाळी एका तरूणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला यवत पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. मात्र काही वेळातच संतप्त झालेल्या जमावाने वाहनांची तोडफाड व जाळपोळ केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या आता यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे आणि अशा घटना घडवताना पाहायला मिळत आहे.  त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. 

फडणवीस म्हणाले, या घटनेची सगळी माहिती घेतली आहे. बाहेरच्या व्यक्तीने चुकीच स्टेटस ठेवल्याने आणि पुजाऱ्याने बलात्कार केल्याचा स्टेट्स ठेवल्याने तणाव निर्माण झाला. आणि लोक रस्त्यावर आले. काही ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. आता परिस्थिती नियत्रणात आहे. दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसली आहेत. तणाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे आणि अशा घडवताना पाहायला मिळत आहे.  त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. काल सभा म्हणून असे स्टेट्स ठेवण्याची मुभा दिली आहे का? असे कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. चुकीच्या पद्धतीने धर्मावर अवलंब करणाऱ्यांवर टीका करण्याचे अधिकार नाहीत. सभेचं आणि याच कारण जोडण्याचं कारण नाही. सभा झाली म्हणून आम्ही असे केले अस कुणी म्हणत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आता ते व्हिडिओ तिथले आहे की बाहेरचे हे बघावे लागेल ,अशावेळी अनेकवेळा बाहेरचे व्हिडिओ टाकले जातात. या सगळ्या घटनेची चौकशी केली जाणार. सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कुणीही कायदा हातात घेतले नाही पाहिजे. कुणीही बेकायदेशीर कृत्ये करत असतील तर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSocial Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारण