शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

‘आम्हाला वाटलं बातम्या सांगणाऱ्या माणसाला त्या पाठ असतात म्हणून’..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 13:36 IST

चेहऱ्यावर दिसून येत असलेले समाधान त्यांचा बालदिन सार्थकी लागल्याची साक्ष पटवून देत होते...

पुणे : टीव्हीवरील न्यूज चॅनेलमधील व्यक्ती सुटाबुटात येऊन सफाईदारपणे मराठीत, इंग्रजीत बातम्या सांगते. त्याविषयीची छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत दाखवते. अवघ्या काही मिनिटांत साऱ्या जगाचा वेध घेणारी माहिती ती पटापट प्रेक्षकांना सांगत असताना नेहमी एक प्रश्न पडायचा तो असा की, ती व्यक्ती बोलताना अडखळत कशी नाही? तिचा एकही शब्द मागेपुढे कसा होत नाही? कॅमेरासमोर बोलताना तिला सारे कसे लक्षात राहते? लहानग्या विद्यार्थ्यांच्या मनात गर्दी केलेल्या या प्रश्नांचे आणि कुतूहलाचे समाधान तज्ज्ञांकडून झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असलेले समाधान त्यांचा बालदिन सार्थकी लागल्याची साक्ष पटवून देत होते. ‘लोकमत’च्या वतीने बालदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भोसरीतील इंद्रायणीनगरमधील प्रियदर्शिनी विद्यालयातील व सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन अभ्यास विभागाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी विभागातील स्टुडिओ, आॅडिओ कंट्रोल विभाग, एडीटिंग विभाग यांचे कामकाज कसे चालते हे विभागातील प्राध्यापक संभाजी नलावडे यांच्याक डून समजावून घेतले. याबरोबरच माध्यमे नेमकी कशा प्रकारे काम करतात? टीव्हीवर बातम्या सांगणारा व्यक्ती सलगपणे कसे काय बातम्या सांगतो, इनडोअर, आऊटडोअर शूट म्हणजे काय? याबरोबरच चित्रीकरणाच्या वेळेस प्रकाशयोजनाचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी देखील त्यांना माहिती देण्यात आली. बातम्या सांगणाºया व्यक्तीपुढे टेलिप्रॉम्टर नावाचे यंत्र बसविण्यात आल्याने त्यावर ठळक अक्षरात लिहिलेल्या बातम्या ती व्यक्ती वाचत असते. त्याबरोबरच सामान्य प्रेक्षकाला सलग वीस मिनिटे दिसत असलेला कार्यक्रम प्रत्यक्षात चित्रित होताना तुकड्या-तुकड्यात छायाचित्रित केला जातो. अशा प्रकारच्या माहितीने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून आल्याचे या वेळी दिसून आले. टीव्हीवर तासन्तास सलगपणे आपण पाहत असलेल्या मॅचच्या चित्रीकरणाकरिता शेकडो कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे पाहिजे तो अँगल आपल्याला चटकन पाहता येतो. याशिवाय ध्वनिमुद्रण, ध्वनिसंकलन, संगीत संकलन यांसारख्या संकल्पनांची थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. विद्यापीठात कार्यरत असलेल्या कम्युनिटी रेडिओ विभागाला यानंतर देखील विद्यार्थ्यांनी भेट दिली. आजवर केवळ ऐकून माहिती असलेल्या रेडिओविषयी प्रत्यक्षात त्याचे कामकाज कशा पद्धतीने चालते याची माहिती करून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. व्हिज्युएल मीडियमच्या जगात वावरताना ऑडिओ मीडियमपासून थोडे लांबवर असलेल्या विद्यार्थ्यांना रेडिओबद्दल फारशी माहिती नसल्याचे या वेळी पाहावयास मिळाले. एखाद दुसरा रेडिओ चॅनेल त्यांना माहिती होता. मात्र आपण रेडिओ ऐकत नाही. त्याऐवजी जास्त वेळ टीव्ही पाहण्यात जात असल्याचे त्यांच्या मनोगतातून व्यक्त होत होते. या विभागातील विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचे महेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना कम्युनिटी रेडिओ, कमर्शियल रेडिओ, एज्युकेशनल रेडिओ, यासारखे रेडिओचे प्रकार समजावून सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेchildren's dayबालदिनStudentविद्यार्थी