शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! "शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा," वसंत मोरेंना थेट मुख्यमंत्र्यांची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:26 IST

वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडल्यावर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर येण्यास सुरवात

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात राजकीय घडामोडींबरोबरच धार्मिक विषयांना हात घातल्याने त्यांच्यावर टीका टिपण्णीचे सत्र सुरु झाले आहे. पुण्यात तर मनसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसू लागले आहे. भाषणानंतर पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी अडचणीत असल्याचे सांगितले होते. 

''मी ज्या भागात १५ वर्षांपासून लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झाल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडले आहे. तर साईनाथ बाबर यांची नवीन शहराध्यक्ष म्हणून  निवड करण्यात आली आहे.       

वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडल्यावर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर येण्यास सुरवात झाली आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोरें यांना फोन केला आहे. ''शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा,'' अशी ऑफर मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे मोरें यांनी सांगितले आहे. एका माध्यमाला मुलाखत देताना ते बोलत होते. 

मोरे म्हणाले, माझ्या शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नाही. आमच्याकडे राज ठाकरे यांचा शब्द अंतीम असतो. वसंत मोरेंच्या निष्ठा अजूनही राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातल्या उत्तरसभेला मी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष यांनी दिली ऑफर 

राज ठाकरे गुढीपाडव्याला मांडलेले विचार सामान्य मराठी माणसाला न पटणारे आहेत. मनसेच्या समस्त कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्याच आवाहन मी करत आहे. वसंत मोरे यांचेही पक्षात स्वागत आहे. आपण कुठल्याही जातिधर्मात न अडकता शहर, राज्य, देशाचा विकास करण्यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत यावे. त्यांचा योग्य तो मानसन्मान जपला जाईल असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना