आमच्याकडेही आहेत तुल्यबळ उमेदवार
By Admin | Updated: August 19, 2014 01:01 IST2014-08-19T01:01:10+5:302014-08-19T01:01:10+5:30
अन्य पक्षातील ताकदवान उमेदवार आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांना का ‘नाही’ म्हणायचे, असा प्रतिप्रश्न महायुतीतील घटक पक्षांनी विचारला आह़े

आमच्याकडेही आहेत तुल्यबळ उमेदवार
पुणो : आमच्याकडे ज्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार आहेत, अशाच जागा प्रामुख्याने आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेनेकडे मागितल्या असून आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आह़े अन्य पक्षातील ताकदवान उमेदवार आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांना का ‘नाही’ म्हणायचे, असा प्रतिप्रश्न महायुतीतील घटक पक्षांनी विचारला आह़े
भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घटक पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार असेल तर आमच्या आमदारांची जागा देण्यासही आम्ही तयार आहोत़ घटक पक्षांनी तुल्यबळ उमेदवार दाखवावेत, असे सांगितले होत़े युतीकडून जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि त्या जागी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरांना संधी द्यायची.याद्वारे पक्षाची आणि अन्य उमेदवारांसाठी आर्थिक व्यवस्था करायची, अशी घटक पक्षांची व्यूहरचना असल्याचे बोलले जात आह़े
राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आह़े आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून पक्षचिन्हही दिले आह़े त्यामुळे ही मान्यता टिकवून ठेवण्यासाठी पक्षचिन्हावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणो हे आमचे पहिले लक्ष्य आह़े पण आम्ही कधीही तिकिटाची विक्री केलेली नाही, असे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले. आमच्या पक्षात तीन माजी आमदारांनी नुकताच प्रवेश केला आह़े त्यांच्यासाठी आम्हाला जागा हव्या आहेत़
युतीकडे 12 जागा मागितल्या आहेत. संघर्ष करून पक्षासाठी कार्य करणारे कार्यकर्ते असून त्यांच्यासाठीच या जागा मागितल्या आहेत़ त्या जागाही भाजपा, शिवसेना हे जेथे दुस:या, तिस:या क्रमांकावर आहेत अशाच आहेत़ येत्या 22 ऑगस्टर्पयत हे घटक पक्षातील जागावाटप निश्चित झाले असेल, अशी अपेक्षा जानकर यांनी व्यक्त केली. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे म्हणाले, जागावाटपाबाबत युतीबरोबर दोन बैठका झाल्या आहेत़ आम्ही काही जास्त जागा मागत नाही आणि कोणाला किती जागा मिळाल्या म्हणून महायुतीत भांडणो होणार नाहीत़
अनेक ठिकाणी संघर्ष करून ज्यांनी आपला कार्यकत्र्याचा संच तयार केला आहे, अशा ठिकाणच्याच जागांची मागणी आम्ही केली आह़े भाजपा, शिवसेनेप्रमाणो आम्हालाही पक्ष वाढवायचा आह़े लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी अन्य पक्षांतील इच्छुकांना घेऊन उमेदवारी देऊन आपले बळ वाढविले होत़े त्याप्रमाणो कोणी आमच्याकडे येत असेल तर त्यांना आम्ही जरूर संधी देणार आहोत, असे ते म्हणाले.
सर्व निवडणुका आर्थिक गणितावर अवलंबून नसतात; नाहीतर टाटा, बिर्ला हेही खासदार, आमदार झाले असत़े अंतिम बैठकीत कोणाला किती जागा मिळतील, हे स्पष्ट होईलच़ पण जागावाटपावर जास्त भर न देता सत्ताबदल घडविण्यावर आमचा भर असेल, असे मेटे यांनी सांगितल़े
शिवसंग्राम या सामाजिक संघटनेचे लवकरच राजकीय पक्षात रूपांतर केले जाणार असून, चार दिवसांत मुंबईत पक्षाची रीतसर घोषणा केली जाईल़ विधानसभेसाठी जागा मागताना आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. जेथे शिवसेना व भाजपाचे आमदार आहेत त्या जागांचा तसेच ज्या मतदारसंघांमध्ये उभय पक्षांकडे सक्षम उमेदवार आहेत, त्या जागांचा आम्ही आग्रह धरणार नाही़
- आ. विनायक मेटे, संस्थापक अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना