शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला राजकारणात यायचं नाही; तिकडं लय पैसा लागतो - मनोज जारांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 11:26 IST

राजकारणात नाही यायचं, आम्ही सामांन्यांसाठी लढत आहोत, आम्हाला फक्त आरक्षण द्या

पुणे: लाखो मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे पाटलांचा काल पुण्यात प्रवेश झाला. तोच उत्साह, जल्लोष पाटलांवर ती फुलांची उधळण अशा वातावरणात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. आज ते शहराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मनोज जरांगे यांचा मोर्चा पुणे शहरातील उपनगरातून मोठ्या संख्येने पुढे जात आहे. चौकाचौकात त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. मोर्चामध्ये पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तुम्ही राजकारण येणार आहात का? असा प्रश्न विचारला असता. त्यांनी तिकडं लय पैसा लागतो असं सूचक वक्तव्य केलं आहे. 

पाटील म्हणाले, आम्ही सामान्य माणूस आहोत. आम्हाला राजकारणात यायचं नाही. तिकडं लय पैसा लागतो. ते आपलं काम नाही. आम्ही सामांन्यांसाठी लढत आहोत. आम्हाला फक्त आरक्षण द्या.  मुंबईत जमावबंदी आहे तरी तुम्ही एवढा मोर्चा घेऊन तिकडं चालला आहात? असे विचारले असता जारांगे पाटील म्हणाले, आमच्यासाठी जमावबंदी आहे असं काही नाही. मुंबईच्या वाहनांना प्रवेश नाही असंही काही नाही. ते मोठं शहर आहे. विविध कारणास्तव तिकडं जमावबंदी लागू केली जाते. आम्हाला मुंबईला जायची हौस नाहीये. शासनाने सांगितलं कि, ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. त्या वाटप केले पाहिजेत 

सध्या संपूर्ण समाज रस्त्यात उभा आहे. आमची नवीन काही मागणी नाही. इतका मोठा समुदाय येतोय. त्यांनी दिलेल्या शब्दावर आम्ही येतोय पण तेच काम करत नाहीयेत. ७ महिने सरकाराला वेळ दिला आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या वितरित का केल्या नाहीत. कायदा बनवणारे आले होते त्यांचा शब्द होता तो पाळला नाही. कायदेशीर बाजू मांडत नाही हेच चुकीचं आहे. तर मग ओबीसी बांधवाना नोंदी मागितल्या नाहीत. आम्हाला मात्र नोंदी मागत आहेत. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. 

आम्ही कोणालाही वेठीस धरले नाही

रोजच जगणं सुरळीत व्हावं यासाठीच आम्ही आरक्षण मागतोय. तुमच्या दारातून आम्ही १ दिवसापुरते आलोय. आम्ही तुमच्या दारातून एकदा चाललोय. तुम्ही फक्त १ तांब्या पाणी द्या. आम्ही कोणालाही वेठीस धरले नाही. तुमच्या मोठ्या शहरातून एक रस्ता आम्हाला द्या. 

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBCअन्य मागासवर्गीय जाती