शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही - सुनील तटकरे

By राजू इनामदार | Updated: June 6, 2025 19:16 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आम्ही मित्रपक्षांबरोबर संस्थानिहाय चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाबरोबर एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही; त्यामुळे या विषयावर चर्चाही नाही व पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात हा विषयही नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आम्ही मित्रपक्षांबरोबर संस्थानिहाय चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

पक्षाचा वर्धापनदिन बालेवाडी क्रीडासंकुलात १० जूनला होणार आहे. त्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी म्हणून तटकरे पुण्यात आले होते. आमदार चेतन तुपे, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, प्रमुख प्रवक्ते आनंद परांजपे, सूरज चव्हाण, संजय बोरगे, संजय तटकरे, सुरेश घुले, योगेश बहल, सुभाष जगताप, प्रदीप देशमुख व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. अजित पवार यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेने मतांची मोहोर उमटवली. त्यामुळे कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. आमचा पक्ष सरकारचा महत्त्वाचा घटक आहे. महायुतीतील प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुकांना सामोरे जाऊ, त्याआधी प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका अशी संस्थानिहाय चर्चा होईल व त्यानंतरच कोणाला किती जागा याचा निर्णय घेतला जाईल.’

पक्षाचा वर्धापनदिन हा पुढील दिशा ठरवण्यासाठी व मागील कामगिरीचे अवलोकन करण्यासाठी असतो. १० जूनला अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व नेते, मंत्री, पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे नेते असतात. त्यामुळे त्यांची उपस्थिती असणारच आहे. सर्वांबरोबर संवाद साधून पक्षाची आगामी दिशा निश्चित केली जाईल. नागरिकांसाठीही हा वर्धापनदिनाचा कार्यक्रम खुला आहे, त्यांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन तटकरे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsunil tatkareसुनील तटकरे