शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

‘राजू शेट्टींचे नाव आम्ही वगळले नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “राजू शेट्टी यांचे नाव आम्ही वगळलेले नाही. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “राजू शेट्टी यांचे नाव आम्ही वगळलेले नाही. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे दिलेल्या यादीत त्यांचे नाव आहे,” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शेट्टी नाराज असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात विचारले असता पवार म्हणाले, “शेट्टी नाराज आहेत का हे मला माहिती नाही. त्यांनी कोणती भूमिका घेतली असेल तर त्याबद्दल मला कल्पना नाही.” महापालिकेच्या शाळेचे उद्घाटन केल्यानंतर शनिवारी (दि. ४) ते पत्रकारांशी बोलत होते.

महाआघाडी सरकारने विधान परिषदेवरील बारा सदस्यांच्या निवडीसाठीची बारा जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली आहे. मात्र, गेल्या सुमारे वर्षभराच्या कालावधीत यावर निर्णय झालेला नाही. त्यातच तीन दिवसांपूर्वी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शेट्टी यांनीही नाराजी व्यक्त केली. मात्र, शेट्टी यांचे नाव वगळले नसल्याचे स्पष्ट करत शरद पवार यांनी या वादंगाला पूर्णविराम दिला.

पवार म्हणाले की, राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबाबत मला काही म्हणायचे नाही. ‘राष्ट्रवादी’कडून जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यपालांना दिली त्यात त्यांचे नाव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो आहोत.

चौकट

केंद्राच्या सूचना महत्त्वाच्या

भाजपा, मनसे यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णाा हजारे यांनी मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, “केंद्र सरकारने खबरदारी घेण्यासंदर्भातल्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. अन्य घटकांची मते काय आहेत यापेक्षा केंद्राच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.” माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरू असणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईबद्दल ते म्हणाले की, महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यातही ईडीचा गैरवापर सुरू आहे. या माध्यमातून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. ईडीचा असा गैरवापर यापूर्वी कधीही झाला नव्हता.