शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो; बारामतीत संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:55 IST

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य वाचवणारे, स्वराज्याचे रक्षण करणारे, स्वराज्य रक्षक आणि स्वराज्यवीरच आहेत.

बारामती : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर आहेत ,अशी भूमिका संभाजी ब्रिगेड ने मांडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादंग झाले आहे .या पार्श्वभुमीवर संभाजी ब्रिगेड चे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी संभाजी ब्रिगेड ची भूमिका स्पष्ट केली आहे .         

काटे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत भाषेतून ग्रंथ लिहिला होता. अनेक विविध विषयावरती छत्रपती संभाजी महाराजांनी लेखन केलेला आहे .ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषा अवगत होत्या. छत्रपती संभाजी महाराज उत्तम इंग्रजीचे जाणकार व भाष्यकार होते.  छत्रपती संभाजी महाराज यांचा लढा हा कोणत्याही धर्मासाठी जातीसाठी नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज,  छत्रपती ताराराणी , त्याचबरोबर स्वराज्यातील सर्वच मावळ्यांचा लढा स्वराज्याच्या विस्तारासाठी होता. म्हणूनच तंजावर पासून पेशावर पर्यंत स्वराज्य उभा राहिले होते. शिवरायांच्या शंभूराजांच्या सैन्य दलामध्ये विविध जातीच्या विविध धर्माचे विविध पदाधिकारी व अधिकारी होते. याचे अनेक पुरावे आणि अनेक दाखले इतिहासकारांनी आजपर्यंत अनेक वेळा समोर ठेवलेले आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करताना स्वराज्य वीर असा केला. औरंगजेब, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि इंग्रज यापासून स्वराज्य वाचवणारे, स्वराज्याचे रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणि स्वराज्यवीरच आहेत.      जाती धर्माच्या अस्मितेवरून व महापुरुषांच्या प्रतिष्ठेवरून भाजपकडून नेहमीच राजकारणाची परिसीमा ओलांडली या भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही संभाजी ब्रिगेड कडून निषेध करतो. भाजप ला छत्रपती संभाजी राजें बद्दल खरच प्रेम असेल तर ज्या गोळवलकर गुरुजीने बंच ॲाफ थॅाट मध्ये शंभुराजेंची बदनामी केली ,ते पुस्तक तुम्ही जाळणार का? ही संभाजी ब्रिगेडचे अधिकृत भूमिका असल्याचे  संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष अमोल काटे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडPoliticsराजकारणBJPभाजपा