शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:51 IST

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवार यांनी नकारघंटा वाजवली आहे.

Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राष्ट्रवादाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे पक्षाच्या वर्धापनदिनापर्यंत हा सस्पेन्स कायम होता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या सगळ्या चर्चांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. जे भापसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे. गांधी, शाहू, फुले आणि आंबडेकरांचा विचार असणाऱ्यांना सोबत घेऊ असेही शरद पवार यांनी म्हटलं. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे अनेकवेळा एकाच व्यासपीठांवर आल्याने या चर्चांना उधाण आलं होतं. पुण्यातील साखर संकुलातील बैठकीवेळी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली होती. त्यानंतर आता  पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी हे मोठे विधान केले आहे. संधीसाधूपणा करणाऱ्यांना आम्ही सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेण्यावर शरद पवार यांनी नकारघंटा वाजवली आहे.

 "सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असण्याचे कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरु, चव्हाण, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार असेल तर आम्हाल मंजूर आहे. पण सत्तेच्यासाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. त्यामुळे संधीसाधूपणाचे राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचे नाही. त्या दृष्टीकोनातून आपल्याला पावले टाकायची आहेत," असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्या या विधानावर बोलताना अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस