शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सगळे भारतीय पूर्ण ताकदीने सरकारसोबत आहोत; सुप्रिया सुळेंकडून भारतीय सैन्याचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:22 IST

कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही, हे सगळ्या भारतीयांना सार्थ अभिमान वाटेल की, हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो

पुणे : भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. या कारवाईचे खासदार सुप्रिया सुळेंनी कौतुक केलं आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थात आपण सगळे या काळात भारतीय आहोत. आपण देशा सोबत आहेत. आपल्या आर्मीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. भारतीय सैन्याला मानाचा मुजरा करते. हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे तो योग्यच आहे. भारत सरकारने दिलेले ड्राफ्टींग अप्रतिम आहे ते सगळ्यांनी वाचा त्याच देखील कौतुक करता येईल.

भारताने सांगितल आहे की, हा सगळा क्रूर हल्ला होता आणि आम्ही त्याचा विरोध केला आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही. हे सगळ्या भारतीयांना, तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की, हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो. ज्यांच्या घरात ही दुर्दैवी गोष्ट झाली आहे. ज्यांना वीरमरण आलं. त्यांच्या घरच्याच्या आयुष्यातील सुख आपण परत आणू शकत नाही. ही लढाई दहशतवादाविरोधात आहे हे भारताने सांगितल आहे. नाव काय दिलं हे त्या त्या सरकारच्या मनावर असतं. भारतीय सैन्य जे करत त्याच नेहमी मनापासून मी स्वागत करते. ते कर्तृत्वान आहेत आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. 

राजनाथ सिंह यांचं आणि सरकारच कौतुक 

युद्ध आपण लढलो आहोत. आपला इतिहास युद्धाचा आहे. भारत हा एक आहे राजकीय विषय नाही. आम्ही भारतासोबत आहोत हे आम्ही सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं. ही सगळी चर्चा झाली होती. आम्ही सगळे भारतीय आहोत देशाच्या ऐक्यासाठी पूर्ण ताकतीने सरकारसोबत आहोत अस सांगितलं होत. राजनाथ सिंह यांचं आणि सरकारच कौतुक करायला हवं. 

ही वेळ दहशतवाद्याला हरवायची आहे

ही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही आम्ही सगळ बैठकीत सांगितलं होतं. हे सगळ नाजुकपणे हाताळलं पाहिजे. या काळात आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी शांत रहावं आणि कौतुक करावं. ही वेळ दहशतवाद्याला हरवायची आहे. हे जग दहशतवादाच्या विरोधात आहे. भारत सरकार प्रधानमंत्री आणि त्यांची सगळी टीम यांना सहकार्य करण्याची भूमिका हे सगळ्या नागरिकांचे कर्तव्य असायला हवं.  

टॅग्स :PuneपुणेOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSupriya Suleसुप्रिया सुळेairforceहवाईदलNCPराष्ट्रवादी काँग्रेस