शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

घोडगंगा कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:43 PM

संजय पाचंगे : दोषी असणाऱ्यांवर कारवाईची मागणी

शिरूर : घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर असलेले कर्ज, भ्रष्टाचार पाहता तसेच या कारखान्याचे अध्यक्ष आपल्या नात्यातील व्यक्तीच्या व्यंकटेश कृपा या खासगी कारखान्याला करत असलेली मदत, देत असलेले प्रोत्साहन पाहता घोडगंगा हा कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर असून यास जबाबदार अध्यक्ष व संचालकांकडून शासनाने कर्जाची रक्कम वसूल करावी व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री तसेच सहकार व साखर आयुक्तालयाकडे केल्याचे क्रांतीवीर प्रतिपठाणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

पाचंगे म्हणाले, घोडगंगा कारखान्यावर १८१ कोटी रूपयांचे कर्ज आहे २ङ्म१८-र०१९च्या अंदाजपत्रकात कारखान्याने ३७ कोटी ९४ लाख रुपयांची कर्जफेड केल्याचे नमूद केले आहे. म्हणजेच कारखान्यावर अद्याप १५०कोटी रुपयांचे कर्ज आहे . राज्यातील बंद पडलेल्या कारखान्यांचे उदाहरण पाहता घोडगंगा कारखाना पुढील वर्षी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे .सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे आणि तेच खाजगी म्हणून चालवायचे हे यांचे षडयंत्र आहे. घोडगंगाचे चेअरमन अ‍ॅड.अशोक पवार यांचे आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या व्यंकटेश कृपा साखर कारखान्याकडे जास्त लक्ष असून हा कारखाना उभारणीसाठी पीडीसीसी तसेच रायगड डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकांकडून घेण्यात आलेल्या एकूण ४३ कोटी रुपयांच्या कजार्साठी पवार यांची मालमत्ता तारण असल्याचे कागदपत्रावरून स्पष्ट झाले आहे .पवार यांच्या या भुमिकेमुळे घोडगंगा अडचणीत आल्याचे पाचंगे यांचे म्हणणे आहे. घोडगंगा व व्यंकटेशकृपा या दोन्ही कारखान्यांच्या व्यवहाराच्या चौकशी करावी तसेच नि:पक्ष चौकशी व्हावी यासाठी चेअरमन पवार व संचालकांनी राजीनामा द्यावा या पांचगे यांनी केली.पीडीसीसी व रायगड डिस्ट्रिक्ट बँकेने व्यंकटेश कृपा कारखान्याला नियमबाह्य कर्ज दिले असून या बँकांची, व्यंकटेशने बोगस शेअर्सद्वारे जमा केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या प्रकरणाची तसेच घोडगंगा कारखान्याच्या २०१० ते २०१८या कालावधीतील आर्थिक व्यवहारांची सीबीआय मार्फत चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पाचंगे यांनी सांगितले .१८ डिसेंबरपर्यंत याची चौकशी करुन कारवाई करावी अन्यथा १८पासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे