गुंजवणीतून जाणार पुरंदरला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:46+5:302021-01-13T04:27:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मार्गासनी : तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला बंद पाईपलाईनद्वारे नेण्यासाठी पाईपलाईनच्या कामास गुंजवणी धरणाच्या ...

गुंजवणीतून जाणार पुरंदरला पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्गासनी : तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला बंद पाईपलाईनद्वारे नेण्यासाठी पाईपलाईनच्या कामास गुंजवणी धरणाच्या दिशेने कामास सुरुवात झाली आहे. बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यास वेल्हेकरांचा विरोध आहे. तरी देखील पाईपलाईनच्या कामास सुरुवात केल्याने पुन्हा एकदा वेल्हेकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.
गुंजवणी धरणातील पाणी पुरंदरला जाणार हे निश्चित झाले आहे. यासाठी शासनाने एलअॅन्ड टी कंपनीस कंत्राट दिले आहे. वेल्ह्यातील गुंजवणी धरणाच्या बाजुने पाईपलाईनच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. गुंजवणी संघर्ष समितीच्या माध्यमातुन वेल्हे तालुक्याला गुंजवणीचे पाणी आधी तसेच वाजेघर व वांगणी खोऱ्यास उपसा सिंचन योजना करण्याची मागणी केली आहे.
याबाबतचा प्रस्ताव अजुनदेखील शासनदरबारी ते पडुन आहेत. त्यास मान्यता मिळालेली नाही. गुंजवणीच्या नदीच्या क्षेत्रात पाणी सोडणे तसेच पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना कशा प्रकारे वाटप केले जाणार आहे. हे देखील कोणालाही माहीती नाही. शेतातुन पाईप लाईनचे
तरीदेखील गुंजवणी धरणाचे पुरंदरला नेण्यासाठी अट्टाहास केला जात आहे. रविवारपासून (दि १०) प्रत्यक्ष पाईपलाईनच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
चौकट
पाईपलाईनच्या कामासाठी मागिल महिन्यात वेल्ह्यात पाईप आणले जात होते. यावेळी तालुक्यातील गुंजवणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यास विरोध करुन अस्कवडी या ठिकाणी पाईप लाईनसाठी आणलेले पाईपांचे ट्रक अडविले होते. एका महिन्यात कोणालाही न विचारता पाईपलाईनचे काम प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आले. त्यामुळे वेल्हेकरांच्या तोंडाला पाने पुसली जाण्याची शक्यता आहे.
याबाबत गुंजवणी संघर्ष समितीचे पदाधिकारी अमोल नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पाईपलाईनच्या कामास आमचा
विरोध आहे. खासगी जागेतुन आम्ही पाईपलाईनचे काम होऊ देणार नाही. गुंजवणी धरणासाठी आरक्षित जागेवर पाईपलाईनचे काम सुरु आहे
त्यानंतरच्या कामास आमचा विरोध असणार आहे.
चौकट
पाईपलाईनच्या कामास धरणासाठी आरक्षित केलेल्या जागेतुन करण्यात आलेली आहे. वाजेघर व वांगणीसाठी उपसा सिंचन
योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळणार आहे.
- संतोष डुबल अभियंता गुंजवणी धरण
-----------
वेल्हेकरांना गुंजवणी धरणातील पाणीवाटप कसे केले जाणार तसेच वाजेघर, वांगणी, रांजणे उपसा योजनेस मंजुरी अद्याप मिळाली नाही. तसेच गुंजवणी नदीपात्रात देखील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याची तरतुद कशा प्रकारे केली जाणार आहे. या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय पाईपलाईनच्या काम करु देणार नाही - दिनकर धरपाळे अध्यक्ष गुंजवणी संघर्ष कृती समिती
फोटोसाठी ओळ - गुंजवणी धरण (ता.वेल्हे) पुरंधरला पाणी नेण्यासाठी पाईपलाईनच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.