पाणी, वाहतुकीचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा

By Admin | Updated: June 24, 2014 23:05 IST2014-06-24T23:05:49+5:302014-06-24T23:05:49+5:30

माझा मतदारसंघ हीच माझी ओळख आहे. या मतदारसंघामध्ये शिक्षण, आरोग्य आणि विजेचा तीव्र प्रश्न नाही; मात्र पाण्याचे मोठे संकट आहे.

Water, transport is the most important question | पाणी, वाहतुकीचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा

पाणी, वाहतुकीचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा

>पुणो : माझा मतदारसंघ हीच माझी ओळख आहे. या मतदारसंघामध्ये शिक्षण, आरोग्य आणि विजेचा तीव्र प्रश्न नाही; मात्र पाण्याचे मोठे संकट आहे. पाणी आणि वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मला जे करता येईल, ते सर्व करणार आहे. कारण, तोच प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा आहे, असे मत  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सुळे यांनी आज लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या म्हणाल्या, ‘‘बारामतीमधील 19 गावांमध्ये पाण्याचे तीव्र संकट आहे. त्याला वेगवेगळी कारणो आहेत. मात्र, हे प्रश्न लवकर सुटले पाहिजेत. बारामतीमध्ये एमआयडीसी आल्यास पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल. पुण्यातील वाहतूक, कचरा, रुग्णालयातील कचरा यांचाही मोठा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. खडकवासल्याच्या पाणीसाठय़ानजीक लोकवस्ती वाढल्याने पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत आहे. भविष्यात हा प्रश्न भयंकर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
नागरिकांचा आमच्या सरकारवरच राग होता. त्याचबरोबर लोकांना या असंतोषाचा फायदा घेणारे नेतृत्व हवे होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. भाजपाने जेवढा पैसा खर्च केला, तेवढे बजेट आमच्याकडे नव्हते. माध्यमातील प्रसिद्धीवरून त्यांना मते मिळाली. आमची कामे लोकांपुढे मांडण्यात आम्ही कमी पडलो. माङो वडील शरद पवार हे सत्तेपेक्षा विरोधी पक्षात अधिक काळ होते. त्यामुळे आम्ही विरोधात बसून काम करू, असे सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये अरेरावी आहे, असा आरोप होतो. तो खरा असेल तर, नेत्यांनी बदलले पाहिजे. हा बदल घेऊन आम्ही नागरिकांशी कनेक्ट होऊ. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे असेल, असे सुळे म्हणाल्या.
मुलगी वाचवा अभियानातून मी राज्यात महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलींना राजकारणात येण्यास आणखी वेळ लागेल. कारण, सुरक्षा, करिअर, लग्न यानंतरच मुली राजकारणाचा विचार करतात, असे त्या म्हणाल्या.(प्रतिनिधी)
 
भाजपाने उत्तर द्यावे
केंद्र सरकारने रेल्वेची दरवाढ केली. मुंबईसह अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडणारी नाही. सुषमा स्वराज विरोधी पक्षामध्ये होत्या तेव्हा ‘प्रणवदा, आकडों से पेट नही भरता’, असे म्हणाल्या होत्या. आम्हालाही आज भाजपाला हाच प्रश्न विचारायचा आहे. भाडेवाढीसाठी आम्ही जी कारणो देत होतो, तीच आज भाजपा देत आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
 
काँग्रेसला टोला
 काँग्रेस-राष्ट्रवादीतील वाद विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पूरक नाही. त्याला दोन्ही पक्षांतील नेते खतपाणी घालत आहेत. त्यामुळे नेत्यांनी आपल्या तोंडाला पट्टी लावून घेण्याची गरज आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणताही वाद नाही, मुख्यमंत्र्यांचे पाय ओढण्याचे काम त्यांच्या पक्षातून होत आहे, असा टोला सुळे यांनी लगावला.
 
फुरसुंगीने महापालिकेत यावे
कचरा डेपोचा प्रश्न सोडविण्यासाठी अन्य चार ठिकाणो निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील दोन जागांचा ताबा मिळाला आहे. फुरसुंगी गावाचा प्रश्न सुटण्यासाठी त्याचा महापालिकेत समावेश होण्याची गरज आहे.
 
खासगी जीवन सर्वासारखेच
नोकरी किंवा शेती करणारी महिला यांना खूप कष्ट आहेत. त्यामुळे मी माझी जबाबदारी फार मोठी मानत नाही, असे सुळे म्हणाल्या.

Web Title: Water, transport is the most important question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.