शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

Pune | पुण्यात रमजान महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी पुरवठा होणार खंडित

By निलेश राऊत | Updated: March 21, 2023 15:05 IST

गुरुवारी शहराच्या पूर्व व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवला...

पुणे : रमजान महिन्यात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज खंडीत होऊ नये म्हणून महापालिकेने महावितरणला पत्र दिले खरे. पण स्वत:च रमजान महिन्याच्या सुरुवातीलाच जलशुध्दीकरण केंद्राचे काम काढून, गुरुवारी ( दि.२३ ) शहराच्या पूर्व व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे.

रमजानचा पवित्र महिना येत्या २४ मार्चपासून सुरू हाेत आहे. या काळात, म्हणजे २२ मार्चपासून संपूर्ण महिना पाणीपुरवठा सुरळीत राखण्यासाठी पाणीपुरवठा केंद्रांचा विद्युत प्रवाह खंडित करू नये, असे पत्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला दिले होते. पण नेहमीप्रमाणे गुरूवारचा मुहूर्त काढून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये फ्लो मीटर बसविण्याच्या कामाबरोबरच, पर्वती ते एस.एन.डी.टी. दरम्यान अस्तित्वात असलेल्या १२०० मि.मी. व्यासाचे पाण्याच्या लाईन मधील गळती बंदचे काम करण्यात येणार आहे. तसेच चतुश्रुंगी येथील आशा नगर भागातील पाण्याच्या टाकीला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या लाईनचे मुख्य जलवाहिनीला जोडणेचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या सर्व भागातील पाणीपुरवठा येत्या गुरूवारी बंद राहणार आहे व दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. २४ मार्च रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भागचतुश्रुंगी टाकीवरून पाणीपुरवठा बंद होणारा भाग : चतुश्रुंगी टाकी परिसर, औंध, बोपोडी, औंध रोड, खडकीचा काही भाग (पुणे मुंबई महामार्ग), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आय.टी.आय. रोड, पंचवटी, कस्तुरबा वसाहत, सिध्दार्थ नगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रोड, बाणेर रोड परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, नागरस रोड, आय.सी.एस. कॉलनी भोसले नगर, इंदिरा वसाहत, सकाळ नगर, अनगळ पार्क, राजभवन.

चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा बंद होणारा भाग :- चिखली जलशुद्धीकरण केंद्र, गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती आळंदी रोड, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, बमशिल झोपडपट्टी, पुणे एअर पोर्ट लोहगाव, राजीव गांधी नगर (नॉर्थ आणि साऊथ), विमाननगर, यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, पाराशर सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, खराडी बायपास रोड

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी