शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासलाच्या मुळा-मुठा उजव्या कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 04:22 IST

दौैंड, बारामती, इंदापूर तालुक्यांतील शेतकरी चिंतेत : उन्हाळा शेतीसाठी खूपच कठीण जाणार, पिके जगविणे शेतकऱ्यांना होतेय अवघड

लोणी काळभोर : हवेली, दौंड, इंदापूर या तीन तालुक्यांतील सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रांवरील शेतजमिनीसाठी जीवनदायिनी ठरलेला मुळा-मुठा उजव्या कालव्यातून होणारा व गेला दीड महिना सुरू असलेला पाणीपुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळातील उन्हाळा या भागातील शेतीसाठी खूपच कठीण जाणार आहे.

हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील सहासष्ट हजार हेक्टर शेतजमिनीला खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणांतीलपाणी मुठा उजव्या कालव्याद्वारे पुरविले जाते. गतवर्षीच्या पावसाळ्यात या चारही धरणांच्या पाणलोटक्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे पुणे शहराला पिण्यासाठी लागणारे पाणी राखून ठेवण्यावर जलसंपदा विभागाचा भर असतो. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणी असल्याने कदाचित उन्हाळ्यात शेतीसाठी अजून एक आवर्तन सुटण्याची शक्यता कमी आहे. यासंदर्भात अजून ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु हाच निर्णय होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे नव्या मुठा उजव्या कालव्यातील पाण्यावर अवलंबून असणाºया हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील शेतीतील पिके जगवणे शेतकºयांना अवघड होणार आहे. नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. पावसाळा सुरू व्हायला साधारण चार महिने बाकी आहेत. या चार महिन्यांत शेतीला पाणीपुरवठा कसा करायचा, याची विवंचना शेतकºयांना पडणार आहे.१० जानेवारीपासून पाणीपुरवठ्याचे हे आवर्तन सुरू होते. ते २० फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे. पाण्याचा जोरदार उपसा, उन्हाळ्यामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळी आवर्तन व नागरिकांना पिण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांत सध्या निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. टेमघर धरणाचे काम सुरू असल्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नाही. चारही धरणांमधील पाणीसाठा :खडकवासला ५३.१२.,पानशेत - ४५.४३; वरसगाव - ४८.६५ टेमघर - ०.८६. जलसंपदा विभागाने कालव्याद्वारे होणारे आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरण