शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Alandi: आळंदी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:23 IST

इतर दिवशीही तांत्रिक बिघाड, गळती आदी कारणांमुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे...

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातील पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. त्यामुळे विकत पाणी घेण्याची वेळ आळंदीकरांवर आली आहे. भामा आसखेड धरणातील कमी झालेला पाणीपुरवठा लक्षात घेता पुण्याप्रमाणे आळंदी शहरातही दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असतो. १८ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र इतर दिवशीही तांत्रिक बिघाड, गळती आदी कारणांमुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

आळंदी शहरास पुणे महानगरपालिकेच्या पाइप लाइनवरून पाणीपुरवठा होतो. पुणे महानगरपालिकेची सतराशे मिलिमीटर पाइपलाइनला गळती झाली आहे. तसेच, पुणे शहरात पाणी कपात धोरणामुळे पाणी बंद असल्याने सदर पाइपलाइन गळती काढण्याचे काम सुरू केले आहे. मात्र हे मोठ्या स्वरूपातील काम असल्यामुळे कामास विलंब लागत आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर कुरळी येथील जॅकवेल केंद्रावर पाणी पोहोचण्यास सुमारे चार तासांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर आळंदीला पाणी पोहोचण्यास सुमारे अर्धा - एक तास कालावधी लागणार आहे. त्यामुळे आळंदी शहरात भामा आसखेडवरून पाणी येण्यास विलंब होणार आहे. पाणी आल्यानंतर जलकुंभ भरून शहरात उशिराने पाणीपुरवठा विभागवार सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आळंदी शहरात पाण्याची टंचाई नित्याची झाली आहे. ऐनवेळी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने आळंदीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार कधी? असा सवाल स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

 भामा आसखेड वरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे लिकेज काढण्याचे काम सकाळी ६.३० वाजता पूर्ण झाले असून कुरुळी येथील केंद्रावर पंपिंगचे काम सुरू आहे. सदर पाईपलाईन १६ किमी असून दोन दिवसापासून कोरडी असल्याने लाईन वाश आउट करण्यासाठी चार तास कालावधी लागणार आहे. त्यामुळे कुरुळी येथील केंद्रावर सकाळी १०.३० पर्यंत पाणी येण्याची शक्यता असून तेथून आळंदी शहरास सकाळी ११.०० पर्यंत पाणी पोहोचणार आहे. त्यानंतर टाक्या भरून सुमारे बाराच्या सुमारास शहरातील गावठाण परिसरातील टप्प्यास पाणी सोडले जाईल.

- शीतल जाधव, पाणीपुरवठा विभाग प्रमुख आळंदी नगरपरिषद.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे