पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे

By अजित घस्ते | Published: December 24, 2023 06:13 PM2023-12-24T18:13:39+5:302023-12-24T18:16:05+5:30

शहरात नगरसेवक नाहीत, एक आयुक्त काय करणार? मग आम्ही शहरात फिरताना आम्हाला कचरा, पाणी आणी वाहतूक कोंडी यावर नागरिकांचे प्रश्न येतात

Water situation in Pune critical in future There may be shortage of water Supriya Sule | पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे

पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे

पुणे : पाण्याची स्थिती भविष्यात पुण्यात गंभीर आहे. पाण्याची कमतरता होऊ शकते. आयुक्त, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना एक महिन्यापूर्वी पत्र लिहिले होते. यासाठी नियोजन करावे. पुण्यातील सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा उद्भवणार असे मत खासदार सुप्रिया सुळे व्यक्त केले. तसेच सर्वच समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हीच एनसीपीची मागणी आहे,आम्ही संसदेत आवाज उठवतो, सर्वात जास्त मागणी करणारी मीच पुढे असते. 

या सरकार मध्ये आपण सुरक्षित आहोत, ते सैन शहिद होतंय, इथं पार्लमेंट मध्ये अटॅक होतंय, याचा अर्थ काय? मग आम्ही कांद्याला भाव मागितला, पार्लमेंटच्या अटॅक वर चर्चा मागितली हि आमची चूक? हि लोकशाही नाही, आणीबाणी झाली आहे. ‘देशातील आणीबाणी’ ते पुण्यातील वाहतूक कोंडी, कचरा समस्या आणि गंभीर पाणी प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी घणाघाती टीका केली.

सातारा रोड गृहनिर्माण सोसायटी फोरम आणि पुणे जिल्हा को. ऑप. हौसिंग सोसायटी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभ आणि मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सकाळ समूह संपादक सम्राट फडणीस, सहयोगी संपादक सुहास जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, वृत्त संपादक किरण जोशी , प्रकाश बोरा इ. उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खासदार सुळे यांनी भविष्यात पुण्यातील सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा उद्भवणार असल्याचे सुतोवाच केले.

स्मार्ट सिटी चे काय झाले?

शहरात नगरसेवक नाहीत, एक आयुक्त काय करणार? मग आम्ही शहरात फिरताना आम्हाला कचरा, पाणी आणी वाहतूक कोंडी यावर नागरिकांचे प्रश्न येतात. पुढील सहा महिने तरी डेव्हलपमेंट प्लॅन होणार नाही असे नियोजन करुन  शहराला किती पाणी लागेल, किती विज पुरवठा किती लागेल, असा सर्वांगीण अभ्यास करुन तसा आराखडा तयार केला पाहिजे, स्मार्ट सिटी चे काय झाले? असा उपरोक्त टिका करत शहरातील 24/7 पाणी योजनेवर बोट ठेवले, मी पुण्यात राहते, मला माहिती आहे, पाणी किती मिळते.

Web Title: Water situation in Pune critical in future There may be shortage of water Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.