शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: March 24, 2017 03:56 IST

गेल्या वर्षी जिल्ह्यात वर्षभर टंचाईच्या झळा सुरू होत्या. टँकर बंदच झाले नव्हते. या वर्षी या थोडासा दिलासा मिळाला असून,

जेजुरी : गेल्या वर्षी जिल्ह्यात वर्षभर टंचाईच्या झळा सुरू होत्या. टँकर बंदच झाले नव्हते. या वर्षी या थोडासा दिलासा मिळाला असून, मार्चअखेर टँकर सुरू झाले आहेत. टँकरची मागणी होऊ लागली असून आता फक्त पुरंदर तालुक्यात ४ टँकरने ३ गावांतील २१ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. ८ हजार २८ लोकांना सध्या टंचाईची झळ बसत आहे. पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील राख, वाल्हे, पिंपरी, एखतपूर, मुंजवडी या गावांचे टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अजूनही साकुर्डे, जेजुरी ग्रामीण, बेलसर, सोनोरी, दिवे, मावडी क.प., बहिरवाडी, नावळी, घेरा पुरंदर, कुंभारवळण, भोसलेवाडी, कर्नलवाडी, राजुरी गावांतील टँकरचे प्रस्ताव दाखल असल्याची माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी दिली आहे.या वर्षी पुरंदर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पूर्व पुरंदरच्या पट्ट्यात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पश्चिम पट्ट्यातील सुमार पावसामुळे कऱ्हा नदीतून वाहिलेल्या पाण्यावर नाझरे जलाशयात केवळ ४० टक्केच (३८५ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा निर्माण झाला होता. त्यावर परिसरातील पाणी योजनांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी ही इतर गावांची पिण्याच्या पाण्याची तीव्रता दिवसेंदिवस तीव्र स्वरूपाची होऊ लागली आहे.इतर ६ गावठाणे आणि ६८ वाड्यावस्त्यांवरील १३ हजार ७२१ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागणार आहेत. लवकरच येथील टँकरचे प्रस्ताव मंजूर होऊन टँकर सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे रवींद्र गायकवाड यांनी संगितले. वरील गावांचे पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे उद्भव आटलेले असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. (वार्ताहर)