शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पश्चिम भागातील वाहतूक कोंडीवर 'कालव्याच्या जागेची मात्रा': जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा हिरवा कंदील   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 22:15 IST

पश्चिम भागातील वाहतूक कोंडीवर कालव्याच्या जागेची मात्रा  ; पाटबंधारे विभागाला सूचना

पुणे : पुण्याच्या पश्चिम भागाचा विकास झपाट्याने होत असून या भागातील कोंढवे धावडे, उत्तमनगर आणि शिवणे परिसरात मोठ्याप्रमाणावर लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे याभागातील वाहतुकीवर ताण आला आहे. ही वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आता कालव्याची जागा मिळणार आहे. तब्बल सात किलोमीटरची जागा पालिकेला भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला असून त्यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाला याबाबतच सुचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुण्याचा कक्षा विस्तारत असतानाच विविध उपनगरे आणि समाविष्ठ गावे विकसित होत आहेत. याभागात लोकसंख्या वाढत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच खडकवासला धरणाच्या जवळ असलेल्या पश्चिम पुण्याचा विकासही झपाट्याने होऊ लागला आहे. पालिकेने यापूर्वी या डाव्या कालव्याच्या जागेचा रस्त्यासाठी वापर केलेला आहे. पालिकेने २० किलोमीटर जागेवर रस्ता बांधला असून त्यापोटी पालिका जलसंपदाला भाडे अदा करते. आता शिवणे भागातील वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी सात किलोमिटरची जागा महापालिकेला भाडेतत्वावर मिळणार आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी या रस्त्याबाबत पाठपुरावा केला होता. मंत्री पाटील यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाला पालिकेला जागा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच पालिका प्रशासनाने यासंदर्भातील करारनामा करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचाही सूचना केल्या आहेत. ----खडकवासला पाटबंधारे विभागाकडे कालव्याची जागा देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. खासदार सुुप्रिया सुळे यांनी ही मागणी केलेली होती. शासनाकडून अधिकृत निर्णय आल्यानंतर जागा घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल.- राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग-----कोंढवे -धावडे - शिवण्याला शहराला जोडण्यासाठी सध्या एकच रस्ता आहे. याभागातील लोकसंख्या वाढली असून पर्यायी रस्ता आवश्यक आहे. नवीन रस्त्याचे नियोजन करण्यात आले असून पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तीन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरवा केला होता.- सचिन दोडके, नगरसेवक-----डावा कालवा हा कोंडवे- धावडे, एनडीए गेट, पौड रस्ता, कर्वे रस्ता, कोथरुड, शिवाजीनगर मार्गे कृषी महाविद्यालयापासून जातो. हा कालवा अनेक वर्षांपासून बंद आहे. या कालव्याची जागा रस्ता म्हणून विकसीत करण्यात आली आहे. शहरातील पुणेकर आजही या रस्त्याला कॅनॉल रस्ता नावाने संबोधतात. पालिकेने पौड रस्ता आणि कर्वे रस्ता यांना जोडण्यासाठी या रस्त्याचा वापर केला आहे.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीJayant Patilजयंत पाटील