शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

घोडमधून पाणी सोडले ; पिकांना दिलासा

By admin | Updated: February 27, 2015 23:51 IST

चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली.

निमोणे : चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण हे पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. धरणाची साठवण क्षमता ७६३९ दलघफू एवढी असून, मृत पाणीसाठा २१६२ दलघफू एवढा असून, उपयुक्त पाणीसाठा ३१८३ दलघफू एवढा आहे. दरम्यान, धरण बांधणीनंतर आजपर्यंत धरणाच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झालेली आहे. सध्या धरणामध्ये ५३५५ दलघफू एवढा पाणीसाठा असून, तो ५८ टक्के इतका आहे. या धरणाच्या पाण्यावर शिरूर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील सुमारे सहा हजार हेक्टर बारमाही सिंचनाखाली आहे. त्याशिवाय रांजणगाव औद्योगिक वसाहत व घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांना औद्योगिक उपयोगासाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीकाठच्या गावाबरोबरच श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत या मोठ्या लोकसंख्येच्या गावांनाही पिण्यासाठी पाणीपुरवठा येथूनच होतो. धरणाच्या खालच्या भागामध्ये शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शिरसगाव, धनगरवस्ती, नलगेमळा, नांद्रेमळा, खोरेवस्ती व तांदळी-संगम हे सहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. त्यावर सुमारे दोन हजार हेक्टर ओलिताखाली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि बंधाऱ्यांना असणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील गळतीने हे बंधारे कोरडे पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याच्या मार्गावर होती. शेतकऱ्यांनी वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली होती. (वार्ताहर)