पाण्यात कपात का?
By Admin | Updated: October 1, 2014 23:41 IST2014-10-01T23:41:30+5:302014-10-01T23:41:30+5:30
सुभाषअण्णांच्या काळापासून दौंड तालुक्यातील जनतेला वर्षातून पाण्याची पाच आवर्तने मिळायची. मी आमदार असेर्पयत त्यात कपात होऊ दिली नाही.

पाण्यात कपात का?
यवत : सुभाषअण्णांच्या काळापासून दौंड तालुक्यातील जनतेला वर्षातून पाण्याची पाच आवर्तने मिळायची. मी आमदार असेर्पयत त्यात कपात होऊ दिली नाही. मात्र, सध्याच्या आमदारांच्या काळात दौंडकरांना मिळणा:या हक्काच्या पाण्यात का कपात झाली? असा सवाल करीत विद्यमान आमदारांना दौंडकरांना याचे उत्तर द्यावे लागेल, असे माजी आमदार रंजनाताई कुल यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले.
हिंगणीगाडा, वासुंदे, जिरेगाव, रोटी, पांढरेवाडी, कुरकुंभ, कुसेगाव, पडवी परिसरात रंजनाताई कुल यांनी आज महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अॅड. राहुल कुल यांच्या प्रचारार्थ भेटी दिल्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली वाबळे, मनीषा नवले, नूतन खराडे, सरपंच ललिता खराडे, उपसरपंच संजय गायकवाड, ज्ञानदेव खराडे, बाळासाहेब कदम, जयसिंग ताकवले, संग्राम चांदगुडे, शरद लवांड, अप्पाजी खोमणो, विलास शिंदे, सुनील चव्हाण, मंजिरी खराडे, गुलशन शेख, ज्योती खराडे, सुवर्णा ताकवले, सुजाता खराडे, हेमा ताकवले, डॉ. सोनल खराडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. भेटीदरम्यान रंजनाताई यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि महिलांशी संवाद साधला.
खडकवासला धरणाचे पाणी दौंड तालुक्यातील शेतक:यांना वर्षातून पाचवेळा मिळवून देण्यासाठी तत्कालीन आमदार कै. सुभाषअण्णा कुल यांनी कसोशीने प्रय} केले आणि त्यांना यश मिळाले. मी आमदार असतानाही पाण्याची पाच आवर्तने कायम होती. आता मात्र, पाण्यावाचून शेतकरी तडफडत असताना आमदारांना ही अवस्था पाच वर्षांत दिसली नाही, हे दौंडकरांचे दुर्दैव आहे, असेही कुल म्हणाल्या. (वार्ताहर)
जानाई योजना, बंधारे आणि तलावाच्या माध्यमातून हिंगणीगाडा आणि परिसरात पाणी मिळाले होते. तसेच, तालुक्यात पहिल्यांदा बुडीत बंधारे बांधले; परंतु, सत्ताधा:यांनी या योजनांकडे दुर्लक्ष केल्याने विकास रखडला, त्यामुळे दौंडची जनता आता त्यांना माफ करणार नाही. आता आमची सत्ता आल्यानंतर परिसरात पुन्हा विकासाची गंगा आणू, असे आश्वासन माजी आमदार रंजनाताई कुल यांनी दिले.
पावणोतीन कोटींची कामे!
हिंगणीगाडा आणि परिसरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पावणोतीन कोटी रुपयांची कामे केली आहेत, असे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली वाबळे यांनी सांगितले. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अॅड. राहुल कुल यांचा प्रचारदौरा आज खडकी, खोरवडी, कुसेगाव परिसरात झाला. या वेळी नागरिकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला. युवक, महिला, शेतकरी यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध होतो आणि राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.