शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नीरा देवघर कालव्याला सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:37 IST

शेतकऱ्यांनी नीरा देवघर धरणाच्या सांगवी भाटघर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे निवेदन देऊन मागणी केली होती.

ठळक मुद्देधरणातून नीरा नदीत मागील चार महिन्यांपासून पाण्याचा विसर्ग सुरू

 भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि मागील दीड महिन्यांपासून नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याला गुरुवारी रात्री उशिरा ५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्यामुळे पिकाला जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या नीरा देवघर धरणात सध्या ४२ टक्के पाणीसाठा असून, धरणातून नीरा नदीत ८०० क्युसेक्सने पाणी सोडले आहे. मात्र नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडले होते. त्यानंतर तब्बल मागील दीड महिन्यापासून पाणी सोडले नसल्याने भावेखल, अंगसुळे, कंकवाडी, सांगवी, करंजे, नाटंबी, आंबेघर, शिरवलीतर्फे भोर, वेनवडी, उत्रौली, वडगावडाळ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमूग, ऊस व इतर पिके वाळून जात आहेत.यामुळे नाटंबी येथील शेतकऱ्यांनी नीरा देवघर धरणाच्या सांगवी भाटघर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र वरून आदेश नसल्याने पाणी सोडण्यात येत नसल्याचे सांगितले. यामुळे निराश होऊन शेतकरी परत आले होते. भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणभागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि धरण १०० टक्के भरते. या वर्षीही धरण १०० टक्के भरले होते. धरणातून नीरा नदीत मागील चार महिन्यांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदरचे पाणी वीर धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून बारामती आणि फलटणला जाते. हे चक्र सुरू आहे. मात्र धरण असलेल्या भागातील  शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी का मिळत नाही, त्यासाठी नियमावली लावली जाते. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी