पाणी चोरी प्रकरणी होणार कडक कारवाई , पाटबंधारे विभागाचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 08:13 PM2018-03-28T20:13:57+5:302018-03-28T20:13:57+5:30

 नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ११ मार्चपासून सुरू झाले आहे. या हंगामात लाभक्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर होण्याकरता अनधिकृत पाणी वापर व उपसा करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे.

Strong action will be taken against water theft , irrigation department warning | पाणी चोरी प्रकरणी होणार कडक कारवाई , पाटबंधारे विभागाचा इशारा 

पाणी चोरी प्रकरणी होणार कडक कारवाई , पाटबंधारे विभागाचा इशारा 

googlenewsNext
ठळक मुद्दे१४० शेतकऱ्यांवर पोलीस तर २५० हून अधिकांवर दंडात्मक कारवाई 

पुरंदर : महाराष्ट्र राज्य पाटबंधारे विभाग भरारी पथकाच्या मदतीने नीरा डाव्या कालव्यातून अनाधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या चारशेहून अधिक शेतकऱ्यांवर मंगळवारी (दि.२७)कारवाई केली आहे. पाटबंधारे विभागाच्यावतीने यापुढे देखील कडक कारवाईचे धोरण राबवले जाणार असून कोणीही अनधिकृतपणे पाणी उपसा करू नये, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांनी केले आहे. 
   नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ११ मार्चपासून सुरू झाले आहे. या हंगामात लाभक्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर होण्याकरता अनधिकृत पाणी वापर व उपसा करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ कलम ४९ कलम ९३ कलम ९७ नुसार पाणी चोरीचा गुन्हा दाखल करणे व जलसंपदा खात्याच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित व्यक्तीच्या सातबारा उतारावर नोंद करून घेण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. तरी शेतकऱ्यांनी अनधिकृत पाणी उपसा करू नये व होणारी कायदेशीर कारवाई टाळून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे .

Web Title: Strong action will be taken against water theft , irrigation department warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.