शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी चेंबर तुंबून नागरिकांच्या घरात पाणी ; तळजाई वसाहत येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 20:01 IST

पावसाळी चेंबर तुंबल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याची घटना धनकवडी येथील तळजाई वसाहत येथे घडली.

धनकवडी : दहा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. मेघगर्जनेसह रविवारी कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाळी चेंबर तुंबून वाहू लागले , अशाच प्रकारे चेंबरमधून बाहेर पडणारे पाणी उतारावरील दोन घरांमध्ये शिरल्याची घटना तळजाई वसाहत, वनशिव वस्ती मध्ये सोमवारी पहाटे तीन वाजता घडली. 

पद्मावती परिसरातील विणकर सोसायटी पासून तळजाई पठाराकडे जाणाऱ्या मार्गावर कमानी लगत वनशिव वस्ती आहे. या वस्ती मध्ये श्रीमंत कांबळे व त्यांच्या शेजारी फत्तेह मणियार राहतात. श्रीमंत कांबळे कामानिमित्त बाहेर गेले होते. गेली दहा दिवस सुरू असलेला मुसळधार पाऊसाचा जोर रात्री अचानक वाढला होता. कांबळे यांच्या पत्नी ज्योती श्रीमंत कांबळे मुलगी व दोन वर्षेचे बाळ झोपले होते. रात्री कांबळे यांना आचानक आपले पाय ओले झाल्याचे लक्षात आले. त्या पटकन ऊठून आपल्या मुलीला व बाळाला घेेेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागल्या. मात्र आचानक दाराच्या आतुन जोर - जोरात पाणी घरात येऊ लागले. बाळाला उचले पर्यंत घरात गुडघा भर पाणी साचले होते. व साठलेल्या पाण्यात घरसामान बुडाले तर भांडी घरभर तरंगू लागली. 

कांंबळे यांनी आपल्या मोठ्या मुलीला मामाला फोन करून बोलवायला सांगितले. मामा रोहीत शिंदे व कुंदन शिंदे  जवळच थोड्या अंतरावर राहत असल्याने ते लगेच धावत कांबळे यांच्या घरी आले. त्यांनी घरातील पाणी उपासण्यास सुरवात केली. परंतु पाणी काही कमी होता होत नव्हते. शेवटी रोहीतने राष्ट्रशक्ती संघटनेचे पद्माकर कांबळे यांना संपर्क करून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पद्माकर कांबळे पहाटे ३;४५ वाजता घटनास्थळी आले. सर्वानी मिळून  घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु चेंबर मधून पाण्याचा ओघ सुरुच होता. बांगडीवाले फत्तेह मणियार यांनाही संपर्क करुन बोलावण्यात आले.  सर्वजण  घरातील व बांगडीच्या दुकानातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान पहाटे ४;३० वाजता कांबळे यांनी आपत्ती कक्षाला  फोन केला. 

सर्वजण तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी पहाणी केली असता पंधरा दिवसापुर्वी चेंबर दुरुस्ती आणि नविन पाईप लाईन टाकण्याच्या निमित्ताने खोदाई केलेला राडा - रोडा मागील पंधरा दिवसांपासून तेथेच पडून होता. तो आद्याप पर्यंत उचलला नव्हता. असे लक्षात आले. त्यामुळे नविन चेंबरच्या पुढील तीन चेंबर ब्लाॅक झाले होते. त्यामुळे नुकतीच नव्याने टाकण्यात आलेली पाईप लाईन व नविन चेंबर ब्लाॅक झाले. व नविन चेंबर मधून पाणी थेट घरांमध्ये शिरले. सकाळी साधारण ७;४५ वाजे पर्यंत सोनवणे व जगदाळे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्योती कांबळे यांना बारा वर्षाची मुलगी व छोट्या बाळासह रात्र जागून काढवी लागली. मात्र तात्काळ मिळालेल्या मदतीमुळे कांबळे यांनी स्थानीक नगरसेवक महेश वाबळे , राष्ट्रशक्ती संघटनेचे पद्माकर कांबळे यांचे आभार व्यक्त मानले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfloodपूर