शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

पुण्यात पाणीकपातीचे पालकमंत्र्यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 1:52 AM

पुणे : दहा दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला, तर २० टक्के पाण्याची कमतरता भरून निघते. यासाठी शहरातील आमदार, ...

पुणे : दहा दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला, तर २० टक्के पाण्याची कमतरता भरून निघते. यासाठी शहरातील आमदार,खासदार, नगरसेवक एकत्र बसून योग्य ते नियोजन करतील. यामुळे पाण्याचे कोणीही राजकारण करू नये. चर्चेतून सर्वच अडचणींवर मात करता येते, असे सांगत पालक मंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात पाणीकपातीचे संकेत दिले.पुण्यात महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बापट बोलत होते. ते म्हणाले की, यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यात परतीचा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, हवेली या तालुक्यांत पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. त्यात गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा कमी आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा करून बेबी कॅनॉल आणि खडकवासला धरणातून सुरू होणारा उजवाकॅनॉल दुरुस्त करून गळती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी काही दिवस दोन्ही कॅनॉल बंद ठेवावे लागतील. ही दुरुस्ती केल्यानंतर, ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. सध्या धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे.टेमघर धरणाचे पाणी कोणालाही दिले गेले नाही. त्याचा वापर नागरिकांसाठीच करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी धरण मोकळे करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २० टक्के पाणीसाठा कमी आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरशहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शिल्लक पाणीअत्यंत जपून वापरणे गरजेचेआहे. यापुढे पुणे शहरालादररोज १३५० एमएलडी पाणी देणे शक्य नाही.।पुण्याला १३५० एमएलडी पाणी देणे शक्य नाहीपिण्यासाठी पुणे शहराला दररोज १३५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळावे यासाठी जलसंपदा खात्याशी महापालिका झगडत आहे. मात्र, पुण्याला १३५० एमएलडी पाणी मिळणार नाही, असे बापट यांनीच स्पष्ट केल्याने आता कपातीशिवाय पर्याय राहणार नाही. त्याच आता कालवा समिती बरखास्त झाल्याने पाण्याच्या नियोजनाचे अधिकार जलसंपदा प्राधीकरणाकडे गेले आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार पाणी दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाgirish bapatगिरीष बापट