शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड राेडच्या प्रवाशांना अाता बसमध्येही मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 19:48 IST

प्रवाशांना तसेच बसच्या चालक-वाहकांना या वाढत्या तापमानात बसमध्ये पाण्याची साेय असावी या उद्देशाने पुण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सिेंहगड राेडवरील 20 बसेसमध्ये माेबाईल पाणपाेई लावली अाहे.

पुणे : उन्हाचा तडाका दिवसेंदिवस वाढताेय. त्यात नेहमी पाणी जवळ बाळगणे कठीण जाते. या पार्श्वभूमीवर सिंहगड राेड येथील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड रस्त्यावर धावणाऱ्या पीएमपीमध्ये प्रवासी तसेच चालक-वाहकांसाठी माेबाईल पाणपाेईची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली अाहे.     जागतिक वसुंधरा दिनाचे आैचित्य साधत संकल्प प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एक अनाेखा संकल्प केला. वाढत्या उन्हामध्ये अंगातून घामाच्या धारा निघत असतात. त्यातच पीएमपीच्या बसचे चालक अाणि वाहक हे दिवसभर बसमध्येच असल्याने अनेकदा त्यांच्याकडील पाणी अपुरे पडते, त्याचबराेबर प्रवाशांकडेही अनेकदा पाणी नसते. अश्या प्रवाशांची तहान अाता या माेबाईल पाणपाेईमुळे भागनार अाहे.  सिंहगड राेडवरुन जाणाऱ्या बसेसमध्ये या पाण्याच्या बॅग लावण्यात आल्या अाहेत. धायरी बसथांब्याला बस अाल्यानंतर येथील पाणपाेईतील पाणी या बॅगांमध्ये भरण्यात येते. पाणी पिण्यासाठी बॅगेसाेबत एक ग्लासही बसमध्ये ठेवण्यात आले अाहे. विशिष्ट अावरणाच्या या बॅग असल्यने पाणी थंड राहण्यासही मदत हाेत अाहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच साेय झाली अाहे. या उपक्रमाबद्दल प्रवाशांनी संकल्प प्रतिष्ठानचे अाभार मानले अाहे.     संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हा उपक्रम राबवित अाहेत. पुढील तीन महिने या माेबाईल पाणपाेई शहरातील बसेसमध्ये उपलब्ध करुन देणार असल्याचे निलेश गिरमे यांनी सांगितले. या उपक्रमाबाबत बाेलताना प्रतिष्ठानचे सचिव संग्राम जाधव म्हणाले, उन्हाचा कडाका वाढताेय. त्यामुळे प्रवाशांना तसेच चालक, वाहकांना बसमध्ये पाण्याची साेय असावी या उद्देशाने अाम्ही या माेबाईल पाणपाेई बसमध्ये लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागतिक वसुंधरा दिनाची निवड केली. सध्या सिंहगड राेडवरील 20 बसेसमध्ये अाम्ही या पाण्याच्या पिशव्या लावल्या अाहेत. यामुळे प्रवाशांसाठी पाण्याची साेय झाली असून त्यांनी समाधान व्यक्त केले अाहे.  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDhayariधायरीWaterपाणी