शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांवर थेट ‘सीएम’चा आहे ‘वॉच’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:41 IST

मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारावर नजर ठेवली असून मुंंबईतल्या त्यांच्या वॉर रुममधून कार्यकर्त्यांवर थेट वॉच’ ठेवला जात आहे.

ठळक मुद्देमोबाईल अ‍ॅप : अपलोड करावी लागते प्रचार केल्याची माहिती

लक्ष्मण मोरे पुणे : लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोचला असून सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, प्रचार सभा, कोपरा सभांवर भर द्यायला सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे सोशल मिडीयाचा जोरदार वापर प्रचारासाठी सुरु आहे. मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारावर नजर ठेवली असून मुंंबईतल्या त्यांच्या वॉर रुममधून कार्यकर्त्यांवर थेट वॉच’ ठेवला जात आहे. पक्षाने नेमलेल्या बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि मंडल प्रमुखांसाठी मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दररोज केलेल्या पक्षाच्या कामाची माहिती कार्यकर्त्यांना या अँपवर अपलोड करावी लागत आहे. अपलोड केलेल्या या माहितीची खातरजमा करण्यासाठी फडणवीसांच्या मुंबई कार्यालयातून कार्यकर्त्यांना थेट दुरध्वनी करुन विचारणा होत आहे. भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया आणि इंटरनेट माध्यमाचा जोरदार वापर केला होता. भाजपाची टेक्निकल टीमही सक्षम असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या निवडणुकीतही पन्ना प्रमुखांपासून केंद्रीय पातळीवरील कार्यकर्त्यांच्या कामाचे नियोजन ठरलेले आहे. पक्षाने पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि मंडल प्रमुख अशी  ‘ग्राऊंड लेवल’ वरील कार्यकर्त्यांची वर्गवारी केली आहे. तीन चार बुथ प्रमुखांमागे एक शक्ती प्रमुख नेमण्यात आलेला आहे. तीन चार शक्ती प्रमुखांमागे मंडल प्रमुखाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या मंडल प्रमुखांचे  ‘रिपोर्टींग’ स्थानिक आमदारांकडे देण्यात आलेले आहे.पक्षाने या कार्यकर्त्यांसाठी खास मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. पक्षाच्या आदेशानुसार केलेली कामे, प्रचारविषयक कामे तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर त्याचे छायाचित्र आणि माहिती या अ‍ॅपवर अपलोड करावी लागते. अ‍ॅप डाऊनलोड करताना कार्यकर्त्याचे नाव, मोबाईल क्रमांक, जबाबदारी याची सर्व माहिती देण्यात आलेली असल्याने वरिष्ठ पातळीवरुन थेट कार्यकर्त्याशी संपर्क साधणे सोपे होते. सध्या कार्यकर्ते त्यांनी केलेल्या कामांची माहिती मोठ्या प्रमाणावर अपलोड करीत आहेत. माहिती खरी किंवा खोटी याची खातरजमा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन होेत आहे. पुण्यातील बºयाचशा कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे फोन मुंबईतून येत असून त्यांच्याकडे कामाची माहिती विचारली जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस