प्रभागासाठी कचरा व्यवस्थापन आराखडा
By Admin | Updated: September 17, 2014 23:56 IST2014-09-17T23:56:51+5:302014-09-17T23:56:51+5:30
शहरातील कच:याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागाचा सूक्ष्म नियोजन आराखडा (मायक्रो-प्लॅनिंग) तयार करण्यात येणार आहे.

प्रभागासाठी कचरा व्यवस्थापन आराखडा
सुनील राऊत ल्ल पुणो
शहरातील कच:याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागाचा सूक्ष्म नियोजन आराखडा (मायक्रो-प्लॅनिंग) तयार करण्यात येणार आहे. त्यात संबंधित वॉर्डातील कचरानिर्मिती स्रोतापासून त्यांची विल्हेवाट लावण्याच्या उपाययोजनांचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्रथमच शहरात निर्माण होणा:या कच:याची कुंडलीच प्रशासनास तयार करता येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या नेमक्या उपाययोजना करता येणार आहेत.
गेल्या दशकभरात कच:याचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. सध्या शहरात दररोज 1500 ते 1600 टन कच:याची निर्मिती होते. मात्र, या कच:याचे 100 टक्के वर्गीकरण होत नसल्याने, त्यातील अवघ्या 600 ते 700 टनवर प्रक्रिया होत आहे. तर कचरा उरुळी येथील कचराडेपोमध्ये कॅपिंग केला जात आहे. मात्र, या ठिकाणचा डेपो येत्या 31 डिसेंबर 2014 पासून बंद करण्यात येणार आहे. तसेच शहराच्या परिसरात नवीन प्रकल्प उभारणो व शास्त्रीय पद्धतीने भूभराव घालण्यासाठी पालिकेस अद्याप जागा मिळालेली नाही.
त्यामुळे शहरातील कचरा शहरात जिरविणो आणि कचरा निर्मितीचे स्रोत कमी करून स्रोताच्या जागीच तो पुनर्वापर करणो यासाठीचे नियोजन प्रशासन करणार आहे. मात्र, त्यासाठी आधी प्रत्येक प्रभागाची माहिती संकलित करून त्याचा सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.
च् हा आराखडा तयार करण्यासाठी आधी प्रभागाची प्राथमिक स्वरूपाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यात प्रभागाची हद्द, कचरापेटय़ा, एकूण मिळकती, सोसायटय़ा, हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, शाळा, शासकीय आस्थापना, महापालिकेची कार्यालये, मंगल कार्यालये, दवाखाने, लहान विक्रेते, भाजी मंडई, भाजी विक्रेते, स्टेशनरी माल विक्रेते, कंपन्या यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.
च्त्यानुसार, यातील किती मिळकती कच:याचे वर्गीकरण करतात, किती मिळकती कचरापेटीत टाकतात, किती ठिकाणी कचरा प्रक्रिया केली जाते. निर्माण होणा:या कच:याचे स्वरूप, पुनर्वापर होणारा कचरा किती आहे, प्रभागासाठी घंटागाडय़ा किती आहेत, किती रॅगपिकर्स काम करतात अशी इत्थंभूत माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
काय असेल आराखडय़ात
च्प्रभागाची इत्थंभूत माहिती संकलित झाल्यानंतर संबंधित प्रभागाच्या कच:याचे प्रमाण, कच:याचे स्वरूप आणि प्रक्रियेसाठी प्रभागात असलेल्या प्रकल्पांची माहिती घेऊन त्या प्रभागात कोणत्या प्रकारे नवीन प्रकल्प उभारले जातील.
च्कोणत्या प्रकल्पांची गरज
आहे. किती मनुष्यबळ लागणार आहे. तसेच जास्तीत जास्त कचरा वर्गीकरणासाठी काय उपाययोजना करणार, किती आणि कशा प्रकारच्या कच:याचा पुनर्वापर करता येईल
याचे नियोजन त्यात असणार आहे.
शहरातील कच:याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ती सोडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग होऊन प्रभागातील कचरा प्रभागात जिरविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून त्यानुसार, पुढील उपाययोजना केल्या जातील. त्यानुसार, प्रशासनाकडून माहिती संकलनाचे काम सुरू करण्यात आले असून, तीन ते चार प्रभागांचे कामही पूर्णही झाले आहे.
- सुरेश जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख
शहरातील कच:याची सद्यस्थिती
एकूण निर्माण होणारा कचरा- 1600 ते 1700 टन
ओला सुका वर्गीकरण - 500 ते 600 टन
मोठे प्रक्रिया प्रकल्प - 5 (एकूण क्षमता 2100 टन)
प्रत्यक्षात प्रक्रिया होणारा कचरा - 600 ते 700 टन
बायोगॅस प्रकल्प - 20
सुरू असलेले बायोगॅस प्रकल्प - 15